मुंबई | महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ अंतर्गत “जैवविविधता प्रकल्प फेलोशिप, कनिष्ठ जैवविविधता फेलोशिप, एमेरिटस बायोडायव्हर्सिटी फेलोशिपसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे.
MahaForest State Biodiversity Board Recruitment – भारतीय नागरिकत्व असणाऱ्या आणि ज्यांच्याकडे आवश्यक पात्रता आणि अनुभव आहे, असे पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. त्यासाठी एका साध्या कागदावर पूर्ण बायोडेटासह गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्रे, अनुभव प्रशस्तिपत्र इत्यादींच्या स्वयं-साक्षांकित प्रतीसह अर्ज करावा.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज, सदस्य सचिव, MSBB, जय विशिष्टता भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर 440001 आणि त्याची प्रत msbb.ngp@gmail.com वर ईमेलद्वारे पाठवावी. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 ते संध्याकाळी 06.00 पर्यंत आहे.
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे पाठविली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
PDF जाहिरात – Maharashtra State Biodiversity Board Fellow Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in