महाराष्ट्र वन विभाग भरती जाहिरात अपडेट | जाणून घ्या भरतीचा संपूर्ण तपशील| MahaForest Recruitment

मुंबई | वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील (MahaForest Recruitment) पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात 15 जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, 1 ते 20 फेब्रूवारीदरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

वन विभागातील पदभरतीसाठी 20 डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द करून 10 ते 20 जानेवारीदरम्यान परीक्षा घेण्यात येणार होती, तर 30 जानेवारीला निकाल जाहीर करून 5 मार्चपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येणार होते. मात्र, यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.

तसेच वनविभागातील भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक अर्थात टीसीएससोबत करार करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कराराची कार्यवाही सध्या सुरू आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता 20 डिसेंबरला जाहिरात देणे शक्य नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेकरिता सुधारित कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसारच आता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

असा आहे पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम:-

  • सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर
  • भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर
  • जाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी
  • अर्ज स्वीकारणे – 31 जानेवारी
  • ऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब्रुवारी
  • ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 25 फेब्रुवारी
  • आवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च
  • अंतिम निवड सूची जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत
  • नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत

वन विभागात पदे भरण्यासाठी वेळापत्रक, 20 पासून करा अर्ज

वनविभागाच्या भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. वन विभागाच्या रिक्त पदांचा पूर्ण तपशील देणारी PDF सोशल मीडियावर प्राप्त झाली आहे. या PDF मध्ये विविध जिल्ह्यांमधील ९ डिसेम्बर रोजीचे पूर्ण विविरण दिलेले आहे. आपण खालील लिंक वरून PDF बघू शकता. अर्ज प्रक्रिया २० डिसेंबरपासून सुरू होईल. साधारणत: २० ते ३० डिसेंबर दरम्यान अर्ज भरता येणार आहे. १० ते २० जानेवारी २०२३ दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. यामध्ये उल्लेख केल्यानुसार ही भरती टीसीएस आणि आयबीपीएसद्वारे घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वन विभागाच्या भरतीसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत.

PDF जाहिरातरिक्त पदांचा पूर्ण तपशील