मुंबई | प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) (PMAY-U) अंतर्गत प्रकल्पांसाठी विविध रिक्त पदांची भरती (Maha Housing Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याठिकाणी एमआयएस स्पेशलिस्ट, फायनान्स स्पेशलिस्ट, सिव्हिल इंजिनीअर ही पदे भरली जाणार आहेत.
राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेकरीता (PMU) शहर स्तरीय तांत्रिक कक्षातील (CLTC) तज्ञांची एकत्रित मासिक पारिश्रमिक तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्यासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. ही नियुक्त दिनांक 12/09/2023 व 13/09/2024 रोजी पर्यंत असेल. (Maha Housing Bharti 2023)
यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा (PMU), युनिट क्र. 32, 3 रा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई 400026 येथे इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. मुलाखतीकरीता आवश्यक अर्जाचा नमूना व अटी शर्तीसह माहिती पुस्तिका https://mahahousing.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 09/09/2023 पासून उपलब्ध राहिल.
मुलाखतीचा पत्ता – युनिट क्र. ३२, ३रा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई 400026
PDF जाहिरात – Maha Housing Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – mahahousing.mahaonline.gov.in