मुंबई | अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (MAHA DES Recruitment 2023) केली जाणार आहे. एकूण 260 रिक्त पदांच्या भरतीसाठी संबंधित विभागाने अधिसूचना जारी केली असून 5 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
या पदभरती अंतर्गत “सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क” पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै ते 5 ऑगस्ट 2023 आहे. (MAHA DES Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब – सांख्यिकी / बायोमेट्रिक्स / गणित / अर्थशास्त्र / अर्थमिती / गणितीय अर्थशास्त्र / वाणिज्य मध्ये पदव्युत्तर पदवी.
सांख्यिकी सहाय्यक गट क – गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / अर्थमिति / सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी.
अन्वेषक गट क – 10 वी पास
PDF जाहिरात – MAHA DES Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Directorate of Finance and Statistics Department Recruitment
अधिकृत वेबसाईट – www.mahades.maharashtra.gov.in
