Loan on an Aadhar Card: तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर देखील कर्ज मिळते, हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटू शकते. पण हे खरं आहे. सरकारने लहान व्यापाऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री स्वानिधी योजनेच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही भरमसाठ कागदपत्रांच्या आणि वेळखाऊ प्रोसेसेसच्या कटकटी शिवाय 50 हजार रूपयांचे कर्ज मिळवू शकता.
प्रधानमंत्री स्वानिधी योजना – महत्त्वपूर्ण आर्थिक मदत: Loan on an Aadhar Card
कोविड-१९ महामारीच्या काळात, सरकारने लहान व्यवसायांना चालना देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजना सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश हा छोट्या व्यापाऱ्यांना कर्जाची सुविधा देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे आहे.
या योजनेत, सुरूवातीला 10 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. जर हे कर्ज वेळेवर परतफेड केले तर, दुसऱ्या टप्प्यात 20 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळते. याच्या पुढे, वेळेवर परतफेड केल्यास, तुम्हाला 50 हजार रुपये कर्ज मिळवता येते. कर्जाची परतफेड 12 महिन्यांच्या हप्त्यांमध्ये करावी लागते.
आधार कार्डावर आधारित कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा? Loan on an Aadhar Card
आधार कार्डावर आधारित कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला काही सोप्या प्रक्रिया पार कराव्या लागतील:
- आधार कार्डाची आवश्यकता: कर्जासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- कर्ज अर्जासाठी स्थान: अर्ज तुम्ही आधिकारिक बँकांमध्ये, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा ऑनलाइन पोर्टल द्वारे करू शकता.
- मोबाईल नंबर लिंकिंग: कर्ज अर्ज प्रक्रियेसाठी तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असावा लागेल.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्डावर आधारित कर्ज मिळवण्यासाठी तुमच्याकडे काही पात्रता असावी लागेल. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेकडून शिफारस पत्र मिळवणे आवश्यक आहे. याशिवाय, तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर अद्ययावत असावा लागेल. यासाठी इतर कोणतीही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही.
व्याज दर आणि कर्जाचा आकार:
कर्जावर लागू होणारे व्याज दर बँकांच्या सध्याच्या दरांनुसार ठरवले जातील. तसेच, एनबीएफसी (Non-Banking Financial Companies) आणि एनबीएफसी-एमएफआई (Micro Finance Institutions) कडून कर्ज घेतल्यास, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्याज दर ठरवले जातील.
आधार कार्डवर आधारित कर्ज मिळवण्याची ही योजना छोट्या व्यापाऱ्यांसाठी किंवा सर्वसामान्य नागरिकांना एक मोठी आर्थिक संजीवनी ठरू शकते. जर तुम्ही या योजनेचा फायदा घेत कर्ज घेतले आणि त्याची वेळेत परतफेड केली, तर तुम्हाला मोठ्या रकमेचे कर्ज मिळवण्याची संधी देखील मिळू शकते.