मुंबई | भारतीय आयुर्विमा महामंडळाने त्यांच्या विविध विभागीय कार्यालयांसाठी भरतीची घोषणा केली आहे. 15 जानेवारी 2023 रोजी LIC AAO पदांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती LIC व्दारे देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (जनरललिस्ट)- 31 व्या बॅचसाठी अर्ज (LIC AAO Recruitment Apply) करायचा आहे ते LIC च्या अधिकृत साइट licindia.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
LIC AAO पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 15 जानेवारी पासून सुरू करण्यात आली आहे. 31 जानेवारी 2023 रोजी नोंदणी प्रक्रिया थांबवण्यात येईल. परीक्षेच्या 7 ते 10 दिवस आधी उमेदवारांना कॉल लेटर उपलब्ध केले जातील. प्राथमिक परीक्षा 17 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी 2023 दरम्यान घेतली जाईल. या भरती (LIC AAO Recruitment 2023) मोहिमेद्वारे एकूण 300 पदे भरली जाणार आहेत.
पात्रता निकष
परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 21 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असावी.
LIC AAO भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी थेट लिंक (Click)
निवड प्रक्रिया
सहाय्यक प्रशासकीय अधिकार्यांची निवड त्रिस्तरीय प्रक्रिया आणि त्यानंतरच्या भरतीपूर्व वैद्यकीय तपासणीद्वारे केली जाईल.
अर्ज फी
जनरल उमेदवारांना अर्ज शुल्क सह सूचना शुल्क ₹ 700/- + व्यवहार शुल्क + GST आणि SC/ST/ PwBD श्रेणीतील उमेदवारांसाठी ₹ 85 + व्यवहार शुल्क + GST आहे. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार एलआयसीची अधिकृत साइट पाहू शकतात.