कोल्हापूर | पावसाळा सुरू झाला की डोंगरभागातील गाव वस्त्यांना भूस्खलनाचा मोठा धोका असतो. नुकतीच रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली असून दरड कोसळल्याने 48 कुटूंब गाडली गेली आहेत. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्य सुरू आहे.
इर्शाळगड सारख्या दुर्घटना घडू नयेत यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने भूस्खलनाचा धोका असणाऱ्या गावांची यादी जाहिर केली जाते, आणि अशा ठिकाणच्या लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या जातात. कोल्हापूर जिल्ह्यात देखील भूस्खलनाचा धोका असलेली अशी अनेक गावे असून त्याची यादी प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणे / गावे
शाहुवाडी – घोलसवडे, पणुरे, कासार्डे, कांडवणपैकी आगलावेवाडी, माणपैकी ठाणेवाडी, गेळवडे, पुसर्ले, लोलाणे, करंजफेण, मारळे, सावर्डे, शिराळा मलकापूर, विशाळगड भोसलेवाडी, शित्तूर वरुण, कडवेपैकी शिंदेवाडी, उखळू, पणुद्रेपैकी हिंगणेवाडी, भेडवडे, उखळूपैकी अंबाईवाडी पैकी खोतवाडी, शिराळा मलकापूर धनगरवाडा.
पन्हाळा – बडेवाडी डोंगर, पोहाळवाडी दरड, गिरोली जोतिबा दरड, पावनगड दरड, मंगळवार पेटते पन्हाळा दरड, बुधवार पेठ परिसर मुख्य रस्ता, मौजे मराठवाडी, म्हाळूंगे ॲडव्हेंचर पार्क, आपटी.
करवीर – महे, बोलोली, शिपेकरवाड एरिया, आमशी सातेरी, खुपिरे.
गडहिंग्लज – चिंचेवाडी, सामानगड.
भुदरगड – मौजे डेलेपैकी भारमलवाडी, फये, भेंडेवेडी, बीजवडे, पडखांबेपैकी खोतवाडी, पडखांबेपैकी रावणवाडी, वासनोलीपैकी धनगरवाडा, वासनोलीपैकी जोगेवाडी, कालवडेपैकी हारफोडेवाडी, टिक्केवाडी, मंदापूर
राधानगरी – कोणाली तर्फ असंडोली, पाटपन्हाळादरड, गैैबीघाट, शिरगाव, सावतवाडी, मानेवाडी, खामकरवाडी, गोटेवाडी, केळोशी बुद्रूक, केळोशी खुर्द, पाल खुर्द, तळगाव, पडसाळी, राई, माणबेट, चौके, राऊतवाडी, पणोरी, कासारपुतळे, पाल बुद्रूक पैकी मोहितेवाडी, आपटाळ, चोरवाडी, कुराडवाडी, ऐनीपैकी धमालेवाडी, ऐनीपैकी भैरी धनगरवाडा, कासारवाडापैकी धनगरवाडा, धामणवाडीपैकी हणबरवाडी, धामणवाडीपैकी अवचितवाडी, पांडेवाडी, सोळांकूर रामनगर.
कागल – बोळावी ठाणेवाडी, बेलेवाडी मासा, चिकोत्रा खोरे हासूर बुद्रूक, रांगोळी.
आजरा – वाजरे, खोतवाडी, पेरणोली, हारपेवाडी
चंदगड – गंधारगड
गगनबावडा – अणदूर रोड, कडवे रोड, मांडुकली, शेळोशी रोड.
जिल्ह्यातील या 76 गावांमधील धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे कायमस्वरुपी स्थलांतर होणे गरजेचे आहे. याठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम बसवण्याचा विचार झाला होता, पण अजून त्यावर कार्यवाही झालेली नाही.
जिल्ह्यातील 76 ठिकाणे धोकादायक असली तरी त्यातील मानवी वस्ती असलेली मोजकीच गावे आहे. अतिवृष्टी सुरू झाली की परिस्थिती बघून तेथील नागरिकांना जवळचे सभागृह, समाज मंदिर, शाळांमध्ये स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जातात.
- प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी