Govt. SchemeNews

‘नारीशक्ती दूत’ ॲपवरुन ‘या’ वेळेत भरा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज, अर्ज एका मिनीटात भरून व्हाल मोकळे! Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना \’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण\’ योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात येत आहेl. मात्र, ऑफलाईन पद्धतीने भरलेला अर्जही पुन्हा ऑनलाईन पद्धतीने भरावा लागत आहे. त्यामुळे, शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरावा असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Ladki Bahin Yojana: सध्या सेतू केंद्रावर आणि नारीशक्ती दूत अॅपवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले जात आहेत. या अॅपवरुन अर्ज भरताना काही प्रश्न अर्ज भरणाऱ्यांच्या मनात येत असून तांत्रिक एररही दिसत आहेत. त्यामुळे, अर्ज भरताना अर्जदारानी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

नारीशक्ती दूत अॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वप्रथम अर्जदार महिलेचे फ्रोफाईल बनवून घ्यावे लागते. त्यामध्ये, अर्जदार महिलेचे नाव, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यावा लागतो. तसेच, तुमच्या गावाचे नाव, जिल्हा याचीही माहिती द्यावी लागते. अर्ज भरताना अर्जदार महिलेला आधार कार्डवर असलेलं नाव आणि आधार कार्डवरील जन्मतारीख अर्जात नमूद करावी लागते. अर्जात तुम्हाला वैवाहिक स्थिती टाकायची असून विवाहित महिलांनी विवाहित किंवा अविवाहित महिलांनी पतीऐवजी वडील यावर क्लिक करणे गरजेचे आहे. त्यानंतर, तुमच्या बँक खात्याची तपशीलवार माहिती याठिकाणी भरायची आहे. 

अर्ज भरल्यानंतर अर्जदाराने कागदपत्रे अपलोड करायची आहेत. ही सर्व कागदपत्रे स्कॅन करुन घ्यायची आहेत. त्यामध्ये,

1. उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळं रेशनकार्ड, केशरी रेशन कार्ड
2. हमीपत्र डाऊनलोड करुन, त्याची प्रिंट काढून, त्यावर सही करुन अपलोड करायचे आहे.
3. यामध्ये बँक पासबुकच्या फोटोची स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे.
4. अर्जदार महिलेने आपले रहिवाशी अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला, शाळेचा दाखला अपलोड करायचा आहे.

ही सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तिथे अर्जदाराचा फोटो हा ऑप्शन येईल. त्यावेळी, फोटो अपलोड न करता, ऑनलाईन फोटो काढायचा आहे. तेथील बटण प्रेस करुन मोबाईलवरुनच हा फोटो काढता येतो. मोबाईल कॅमेऱ्याने लाईव्ह फोटो काढल्यानंतर, अॅक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर यावर क्लिक करायचे आहे.

image not supported on this device हा एरर नाही

सर्व बाबी सबिमिट केल्यानंतर तुम्हाला बऱ्याचदा image not supported on this device असा मेसेज दिसून येईल. या एररमुळे आपली कागदपत्रे अपलोड झाली की नाहीत? कागदपत्रे अपलोड होताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे का, असा प्रश्न पडू शकतो.  मात्र, तसा मेसेज दिसून आला तरी चिंता करण्याची गरज नसून, हा अॅपचा एरर असल्याने तुमची कागदपत्रे अपलोड झाली आहेत असे समजावे.

डॉक्युमेट अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा, या बटणावर क्लिक करुन तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर 4 अंकी ओटीपी येईल. तो ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओटीपीवर क्लिक करायचं आहे. तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला असून तुम्हाला स्क्रीनवर सर्व्हे नंबर दिसून येईल. या सर्व्हे नंबरचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही जवळ ठेऊ शकता.

\’या\’ वेळेत अर्ज भरणे अधिक सोयीचे  

मोबाईलवरील नारीशक्ती दूत अॅपवरुन एकाचवेळी जास्त लोक फॉर्म भरत असल्याने लोडिंग किंवा बफरिंगची समस्या निर्माण होत आहे. ही तांत्रिक अडचण येत असल्यास, दिवसा अर्ज न भरता रात्री 10 नंतर किंवा सकाळी 7 वाजण्यापूर्वी अर्ज भरल्यास ही अडचण येणार नाही. त्यामुळे, अर्ज भरताना अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास सहज व सुलभपणे अर्ज भरणे सहज शक्य होणार आहे.  

Back to top button