Govt. Scheme

लाडकी बहिण योजने अंतर्गत २१०० रूपये केव्हापासून मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती | Ladki Bahin Yojana

मुंबई | महायुतीच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात होते. मात्र ही रक्कम वाढवून २१०० रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. हे २१०० रुपये कधीपासून येणार याकडे आता महाराष्ट्रातील महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. (Ladki Bahin Yojana)

माजी मंत्री आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत आता २१०० रुपये कधीपासून मिळणार हे स्पष्ट केलं आहे. आदिती तटकरेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा वाढीव निधी येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजे मार्च २०२५ पर्यंत देण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

सध्या नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात लाडकी बहिण योजनेसाठी पुरवणी यादीमध्ये १४०० कोटींची तरतूद केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या होत्या. या योजनांची पूर्तता करण्यासाठी तब्बल ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या असून त्यापैकी १४०० कोटी लाडकी बहिण योजनेसाठी आहेत.

लाडकी बहीण योजनेंतर्गत आलेल्या अर्जांची छाननी सूरू

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेंतर्गत आलेल्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. ज्यामध्ये अनेक अर्ज चुकीचे किंवा अपूर्ण असल्याचे सामोरे आले आहे. ज्यामुळे अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आढळल्या आहेत. याशिवाय अनेकीनी चुकीच्या माहितीखाली लाभासाठी अर्ज केले आहेत. अशा परिस्थितीत, आता अपात्र महिलांना योजनेचे पैसे परतही करावे लागू शकतात.

Back to top button