लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! नवीन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु होणार | Ladaki Bahin Yojana
मुंबई | महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेली लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळत असून, आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात सहा हप्त्यांमधून एकूण 9000 रुपये जमा झाले आहेत.
पुन्हा अर्ज करण्याची संधी – Ladaki Bahin Yojana
काही महिलांनी उशिरा अर्ज केल्यामुळे किंवा अजिबात अर्ज न केल्यामुळे योजनेचा लाभ मिळवू शकल्या नाहीत. मात्र, अशा महिलांसाठी एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. पुढील आर्थिक वर्षात महिलांना दर महिना 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे, आणि या घोषणेनंतर अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, यासाठी काही महिने वाट पाहावी लागू शकते.
महत्त्वाची अट: आधार आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यावश्यक आहे. राज्यातील जवळपास 12 लाख महिलांचे आधार बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांना योजनेचे पैसे मिळण्यात अडथळे आले होते. मात्र, डिसेंबर 2024 पर्यंत ज्या महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले आहे, त्यांना त्यांच्या खात्यात 9000 रुपये जमा करण्यात आले आहेत.
अर्ज प्रक्रियेसाठी महिलांनी काय करावे?
• आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करावी.
• अर्ज प्रक्रिया सुरू होताच योजनेच्या अधिकृत वेबसाइट किंवा नजीकच्या केंद्रावर अर्ज सादर करावा.
• गरज असल्यास मदतीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.