लातूर | कृषी विभाग, लातूर अंतर्गत “कृषि पर्यवेक्षक” पदाच्या 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज (Krushi Vibhag Latur Bharti 2023) मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. इच्छुक अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 आहे.
या पदासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहाय्यक, गट-क या पदावर दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेल्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असतील.
- पदाचे नाव – कृषि पर्यवेक्षक
- पदसंख्या – 99 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – लातूर
- अर्ज शुल्क – रु. 650/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 जानेवारी 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in
PDF जाहिरात | http://bit.ly/3CKatJ9 |
ऑनलाईन अर्ज करा | https://bit.ly/3iw48u7 |
हे ही वाचा – नागपूर कृषि विभाग अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा | जाहिरात प्रकाशित | Krushi Vibhag Nagpur Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कृषि पर्यवेक्षक | 1. महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहायक (गट-क) या पदावर दिनांक १ जानेवारी, २०२३ रोजी किमान ५ वर्षाहुन कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेल्या व्यक्ती. स्पष्टीकरण:- ५ वर्षांची नियमित सेवेची गणना करताना खालील बाबी गृहीत धरण्यात येतील :I. नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, कृषि सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी पुर्ण केल्यापासून,II. पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या दिनांकापासून.2. कृषि सहायक पदावर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती,3. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती; आणि4. एतदर्थ मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार ज्या व्यक्ती हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत किंवा त्यांनी यापूर्वीच सदर परीक्षा उत्तीर्ण केली आहे वा सदर परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. |
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवाराला कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतस्थळावर लॉगइन (Log in) करावे लागेल.
- अर्ज 14 जानेवारी 2023 पासून सुरु होतील.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2023 आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- या भरतीकरिता अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- वरील भारतीकरिता उमेदवारांची निवड स्पर्धा परीक्षेद्वारे करण्यात येईल.
- कृषि पर्यवेक्षक (गट- क) या संवर्गातील पदावरील मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे करावयाच्या नियुक्त्या या सदरच्या परीक्षेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करून, करण्यात येतील.
- सदर परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम शासन अधिसूचना कृषि व पदुम विभाग, दि. २८ नोव्हेंबर, २०१८ अन्वये विहित करण्यात आल्यानुसार राहील.
- विभागीय परीक्षेसाठी दोन पेपर असतील: सामान्य विषय (पेपर- १) व कृषि विभागाचे विषय (पेपर-२).
- प्रत्येक पेपरसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे १०० प्रश्न आणि तितकेच गुण आणि ९० मिनिटांचा कालावधी असेल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.