बुलढाणा | कृषी विभाग बुलढाणा अंतर्गत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया योजना (PMFME) या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्याना पाठपुरावा / हाताळणी सहाय्य देण्यासाठी “संसाधन व्यक्तीची” (Panel of Resource Person) नामिकासुची तयार करावयाची आहे. त्यासाठी सदर योजनेच्या मार्गदर्शक सुचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफयातुन अर्ज मागविण्यात येत आहे. (Krushi Vibhag Buldhana Bharti 2023)
सदरील पदासाठी आवश्यक पात्रता व अनुभव व सविस्तर मानधनाचा तपशिल व अर्जाचा नमुना हा जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा यांच्या http://buldhana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी सदरील पदासाठी अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख ३०.०६.२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यत आहे. (Krushi Vibhag Buldhana Bharti 2023)
यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थांकडील अन्नतंत्रज्ञान/कृषि अभियांत्रीकी/कृषि व कृषि संबंधित पदवी/पदव्युत्तर किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक यशस्वी अहवालासाठी 20,000 इतके मानधन दिले जाईल.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बुलडाणा यांचे कार्यालय, भवटे हॉस्पीटल समोर, धाड रोड बुलढाणा या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावेत.
