मुंबई | राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती (Krushi Vibhag Bharti 2023) केली जाणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त असणाऱ्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांसाठी ही भरती केली जात आहे.
यामध्ये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक (Krushi Sevak Bharti 2023) म्हणून निश्चित वेतनावर (एकत्रित मानधनावर) नामनिर्देशनाने/सरळसेवेने स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. एकूण 2109 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे.
Krushi Vibhag Bharti 2023 – सदर पदे भरण्याकरिता पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज 03 ऑक्टोबर 2023 पर्यंत करायचे आहेत. त्यासाठीची सविस्तर जाहिरात कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

रिक्त पदांचा तपशील –
औरंगाबाद – 196
लातूर – 170
नाशिक – 336
कोल्हापूर – 250
नागपूर – 448
अमरावती – 227
ठाणे – 294
पुणे – 188
PDF जाहिरात – Krushi Sevak Aurangabad Recruitment 2023
PDF जाहिरात – Krushi Sevak Latur Recruitment 2023
PDF जाहिरात – Krushi Sevak Nashik Recruitment 2023
PDF जाहिरात – Krushi Sevak Kolhapur Recruitment 2023
PDF जाहिरात – Krushi Sevak Nagpur Recruitment 2023
PDF जाहिरात – Krushi Sevak Amravati Recruitment 2023
PDF जाहिरात – Krushi Sevak Thane Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – https://krishi.maharashtra.gov.in
उमेदवारांना कृषी सेवक पदासाठी वेबसाइट https://krishi.maharashtra.gov.in/ वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे. तसेच उमेदवार वर दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची पध्दत :-
1. प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.
2. पात्र उमेदवाराला वेब आधारीत (web-based) ऑनलाईन अर्ज www.krishi.maharashtra.gov.in या
संकेतस्थळाद्वारे दि. 14 सप्टेंबर 2023 ते दि. 03 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
3. विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
4. पात्र उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावर वेब बेस्ड (Web-Based) ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दि. 14 सप्टेंबर 2023 ते दि. 03 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये करता येईल.
कृषी सहसंचालक ठाणे विभागात 294 रिक्त जागांची भरती, त्वरित अर्ज करा | Krushi Vibhag Thane Bharti 2023