मुंबई | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL Recruitment) अंतर्गत “वरिष्ठ विभाग अभियंता/इलेक्ट्रिकल/ट्रॅक्शन एनर्जी मॅनेजमेंट, वरिष्ठ विभाग अभियंता/इलेक्ट्रिकल/मुख्य ट्रॅक्शन पॉवर कंट्रोलर” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ विभाग अभियंता/इलेक्ट्रिकल/ट्रॅक्शन एनर्जी मॅनेजमेंट, वरिष्ठ विभाग अभियंता/इलेक्ट्रिकल/मुख्य ट्रॅक्शन पॉवर कंट्रोलर
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा – 55 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्मिक अधिकारी, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., चौथा मजला, बेलापूर भवन प्लॉट क्र. 6, सेक्टर-11, C.B.D. बेलापूर, नवी मुंबई, पिन-400614.
- ई-मेल पत्ता – krclredepu@krcl.co.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – konkanrailway.com
- PDF जाहिरात – shorturl.at/gsBF9
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ विभाग अभियंता/इलेक्ट्रिकल/ट्रॅक्शन एनर्जी मॅनेजमेंट | अर्जदाराला इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टीम (TRD/Electric Loco/EMU) क्षेत्रातील किमान पाच (05) वर्षांचा अनुभव असावा आणि तसेच अर्जदाराला डेटा विश्लेषण आणि इतर कामांसाठी संगणकाचे चांगले ज्ञान असावे. |
वरिष्ठ विभाग अभियंता/इलेक्ट्रिकल/मुख्य ट्रॅक्शन पॉवर कंट्रोलर | अर्जदाराला इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टम ऑपरेशन आणि मेंटेनन्सच्या क्षेत्रातील किमान पाच (05) वर्षांचा अनुभव असावा तसेच अर्जदाराला डेटा विश्लेषण आणि इतर कामांसाठी संगणकाचे चांगले ज्ञान असावे. |