Tuesday, September 26, 2023
HomeCareer'लिपिक' पदांसाठी मोठी भरती; कोल्हापूर नागरी बँकेत त्वरित अर्ज करा | Kolhapur...

‘लिपिक’ पदांसाठी मोठी भरती; कोल्हापूर नागरी बँकेत त्वरित अर्ज करा | Kolhapur Nagri Bank Bharti 2023

मुंबई | कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत लिपिक पदांसाठी भरती (Kolhapur Nagri Bank Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023)

उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज 8 दिवसांच्या आत संपूर्ण बायोडाटा, फोटो, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे व इतर माहितीसह दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. अर्जाचा नमुना kopbankasso.com या असोसिएशनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन, 1458 बी/ जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर.

या पदांची भरती, लेखी परीक्षा व तोंडी मुलाखतीद्वारे केली जाईल. यासाठी परीक्षेचे शुल्क रु. 590/- जी.एस.टी. सहीत (विनापरतीची) आहे. सदर शुल्क ऑनलाईन पद्धतीने असोसिएशनच्या खात्यावर जमा करुन त्याचा तपशील अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. (Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023)

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, MS-CIT/ मराठी व इंग्रजी टायपिंग / संगणकाचे ज्ञान आवश्यक, JAIIB / CAIIB /GDC & A, बँकींग/सहकार कायदेविषयक पदवीका उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.

शैक्षणिक व अन्य कागदपत्रांची आवश्यकता नाही. अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे स्कॅन करून पाठवू नयेत. कागदपत्राची पाहणी प्रत्यक्ष मुलाखतीच्यावेळी केली जाईल. तसेच असोसिएशनच्या वेबसाईटवरील नमुन्यामध्येच अर्ज करावा लागेल.

PDF जाहिरात Kolhapur Nagri Bank Bharti 2023
अधिकृत वेबसाईटkopbankasso.com


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular