प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर की राजेंद्र पाटील यड्रावकर? कोल्हापूरातील शिंदेसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर!
कोल्हापूर | महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत राज्यात महायुतीने एकहाती सत्ता मिळवली. अस असलं तरी अजूनही खातेवाटप व मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांमध्ये जोरदार मतभेद सुरू आहेत.
मंत्रीपदांसाठी सुरू असलेला तिढा सोडवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून बैठकांवर बैठका सुरू आहेत. मात्र अजूनही फॉर्मुला ठरलेला नाही. अशातच शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. माझाने याबाबत बातमी दिली आहे.
शिंदेसेनेत यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी!
शिवसेना शिंदे गटाकडून शंभूराज देसाई, दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आणि संजय शिरसाठ हे कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेण्याची शक्यता आहे. तर विजय शिवतारे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र यड्रावकर व योगेश कदम यांना राज्यमंत्रीपदाची शपथ दिली जाऊ शकते.
शिंदेंना महायुती सरकारमध्ये 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदे मिळण्याची शक्यता
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे दहा उमेदवार निवडून आले आहेत. संभाव्य राज्यमंत्रीपदांमध्ये प्रकाश आबिटकर किंवा राजेंद्र पाटील यड्रावकर या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून कोल्हापूरमधून राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर सुद्धा मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. मात्र संभाव्य यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश नसल्याचे दिसते. त्यामुळे प्रकाश आबिटकर किंवा राजेंद्र यड्रावकर या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.