कोल्हापुरात भाजप महायुती कडून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; 10-0 असा ऐतिहासिक विजय.. जाणून घ्या विजयी उमेदवारांच्या निकालाची आकडेवारी | Kolhapur Vidhan Sabha Election Result 2024
कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीने प्रचाराचा नारळ कोल्हापूरातून फोडला. मात्र हा प्रचाराचा नारळ आमदारकीचा गुलाल लागण्यापर्यंत नेण्यात महायुतीलाच यश मिळाले. महाविकास आघाडीला मात्र प्रचाराचा नारळ फोडण्यावरच समाधान मानावे लागले. त्यामुळे महाविकास आघाडीला जिल्ह्यातील 10 पैकी एकाही उमेदवाराला विजयाचा गुलाल लावण्याची संधीच मिळाली नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील निकालाने संपूर्ण राज्यालाच धक्का बसला आहे. महायुतीने निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात सभा घेऊन फोडला. त्याच वेळी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे यांनी देखील प्रचाराची सुरुवात कोल्हापूरातून केली होती. मात्र आज निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातून काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला असून जिल्ह्यातील 10 पैकी एकाही मतदारसंघात महाविकास आघाडीला विजयाचा नारळ फोडता आलेला नाही.
1. कोल्हापूर उत्तर विधानसभा
राजेश क्षीरसागर : शिवसेना : मिळालेली मते 110470
राजेश लाटकर: अपक्ष : मिळालेली मते: 80798
विजयी उमेदवार – राजेश क्षीरसागर – 29827 मतांनी विजयी
2. राधानगरी विधानसभा
प्रकाश आबिटकर: शिवसेना: मिळालेली मते: 142688
के पी पाटील: शिवसेना ठाकरे गट : मिळालेली मते: 104666,
विजयी उमेदवार – प्रकाश आबिटकर 38,022 मतांनी विजयी
3. कागल विधानसभा
हसन मुश्रीफ: राष्ट्रवादी अजित पवार गट: मिळालेली मते: 143505
समरजित घाटगे: राष्ट्रवादी शरद पवार गट : मिळालेली मते: 131472
विजयी उमेदवार – हसन मुश्रीफ 12033 मतांनी विजयी
4. इचलकरंजी विधानसभा
राहुल आवाडे: भाजप: मिळालेली मते: 121167
मदन कारंडे: राष्ट्रवादी शरद पवार गट: मिळालेली मते: 73976
विजयी उमेदवार – राहुल आवाडे 57191 मतांनी विजयी
5. कोल्हापूर दक्षिण विधानसभा
अमल महाडिक: भाजप: मिळालेली मते: 147044
ऋतुराज पाटील: काँग्रेस: मिळालेली मते 128913
विजयी उमेदवार – अमल महाडिक – 18131 मतांनी विजयी
6. शिरोळ विधानसभा
राजेंद्र पाटील यड्रावकर: अपक्ष: मिळालेली मते: 133731
गणपतराव पाटील: काँग्रेस : मिळालेली मते: 92882
विजयी उमेदवार – राजेंद्र पाटील यड्रावकर – 40800 मतांनी विजयी
7. शाहूवाडी विधानसभा
विनय कोरे: जनसुराज्य पक्ष : मिळालेली मते: 1,36,064,
सत्यजित पाटील सरूडकर: शिवसेना ठाकरे गट: मिळालेली मते: 1,00,011,
विजयी उमेदवार – विनय कोरे – 36053 मतांनी विजयी
8. चंदगड विधानसभा
शिवाजी पाटील: अपक्ष : मिळालेली मते: 83753
राजेश पाटील: राष्ट्रवादी अजित पवार गट: मिळालेली मते:59475
नंदाताई बाभुळकर: राष्ट्रवादी शरद पवार: मिळालेली मते:46787
विजयी उमेदवार – शिवाजी पाटील – 14278 मतांनी विजयी
9. हातकणंगले विधानसभा
अशोकराव माने: जनसुराज्य पक्ष : मिळालेली मते: 134191
राजू बाबा आवळे: काँग्रेस: मिळालेली मते: 87942
सुजित मिणचेकर: स्वाभिमानी पक्ष: 24952
विजयी उमेदवार – अशोकराव माने – 46249 मतांनी विजयी
10. करवीर विधानसभा
चंद्रदिप नरके: शिवसेना: मिळालेली मते: 133545
राहूल पाटील: काँग्रेस: मिळालेली मते: 131069
संताजी बाबा घोरपडे: जनसुराज्य : मिळालेली मते: 7887
विजयी उमेदवार – चंद्रदीप नरके – 2447 मतांनी विजयी