News

पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार, तिघांना अटक | Kolhapur Crime News

कोल्हापूर | राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथील एका विवाहितेला, तिच्या पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीसांनी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर विवाहितेला वारंवार धमकी देत, एकाने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर इतर दोघांनीही अश्लील फोटो काढून फोटो आणि त्यांच्या संबंधाबाबत धमकावून शारीरिक अत्याचार केले. अखेर याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राधानगरी पोलीसांनी तिघांना अटक केली. त्यांना राधानगरी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथील विवाहित महिलेचे अश्लील फोटो काढून तिला धमकावत फेब्रुवारी २०२३ ते जानेवारी २०२४ च्या दरम्यान फिर्यादीच्या घरी तसेच इतर विविध ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

याबाबत मोहन रामचंद्र पोवार, सागर चंदर मोहिते, रवींद्र श्रीपती बारड यांना राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे. तिघाना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घेरडीकर, प्रणाली पवार यांच्यासह राधानगरी पोलीस करत आहेत

Back to top button