कोल्हापूर: वेसरफ धरण 100% भरले, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, जिल्ह्यातील 34 बंधारे पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | Kolhapur Rain Update 7 July 2024
कोल्हापूर | जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Kolhapur Rain Update) नदी-नाले आणि धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. आज सकाळी ५.३० वाजता गगनबावडा तालुक्यातील वेसरफ ल.पा. तलाव १००% भरला आहे. सदर प्रकल्पाच्या सांडव्यावरून १२५ क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीपात्रातील पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असलेने याठिकाणी पर्यटकांना येण्यास बंदी असल्याचे कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) कोल्हापूर यांनी कळवले आहे.
जिल्ह्यातील 34 बंधारे पाण्याखाली, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ – Kolhapur Rain Update
दि. 07/07/2024
सकाळी 8:00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
28\’ 01\” (538.74 m)
विसर्ग 26376 cusecs
(पंचगंगा नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
एकुण पाण्याखाली बंधारे – 34