News

42.5 फूटामुळे पंचगंगा धोका पातळीकडे; धरणक्षेत्रात अतिवृष्टी सूरूच.. महापूराचा धोका वाढला | Kolhapur Rain Update 24 July 2024

कोल्हापूर | पंचगंगा नदीची पाणीपातळी 42.5 फूटांच्यावर गेल्याने महापूराचा धोका निर्माण झाला आहे. पंचगंगेने इशारा पातळी ओलांडल्यानंतर देखील पावसाचा जोर कायम राहिल्याने धोका पातळी ओलांडली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती.

काल दिवसभरात धरणक्षेत्रात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाने पंचगंगेची पाणीपातळी आणखी वाढली असून धोका पातळीजवळ पोहचली आहे.

https://hellokolhapur.com/kolhapur-kalamba-lake-overflow-2024/

Kolhapur Rain Update

जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा मारा सुरूअसून गेल्या 24 तासांत राधानगरीसह 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली आहे. यामुळे राधानगरी धरण 91 टक्के भरले असून, धरणातून 1500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पावसामुळे पंचगंगा धोका पातळीजवळ पोहचली असून पाणीपातळी आज दुपारी 3 वाजता 42 फूट 5 इंचांवर होती.

पुराचे पाणी केर्ली रस्त्यावर आल्याने कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील केर्ली ते कोतोली फाटा दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली. तर शहरात देखील जामदार क्लबपर्यंत पुराचे पाणी आले असून, आतापर्यंत शहरातील शंभराहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

दि.24/07/2024
दु. 03:00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
42\’-05\”
( 543.11m )
विसर्ग 62143 Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
*एकुण पाण्याखाली बंधारे – 81

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 7.71 टीएमसी पाणीसाठा, 81 बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगांव, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण, वालोली व कुंभेवाडी, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, गवशी, गाटीवडे वारणा नदीवरील -चिंचोली, माणंगाव, कोडोली, शिगांव, खोची, तांदूळवाडी व दानोळी, कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिगांव, सवतेवाडी व सरुडपाटणे, शाळी नदीवरील- येळाणे, दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी व दत्तवाड, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारेगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, शेणगांव व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, ऐनापूर, निलजी,गिजवणे व जरळी घटप्रभा नदीवरील- कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगांव, तारेवाडी, कानडेवाडी व आडकूर, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी असे एकूण 81 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 7.71 टीएमसी, तुळशी 2.76 टीएमसी, वारणा 29.28 टीएमसी, दूधगंगा 17.67 टीएमसी, कासारी 2.04 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 1.93 टीएमसी, पाटगाव 3.32 टीएमसी, चिकोत्रा 0.97 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.48 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 41.11 फूट, सुर्वे 39.5 फूट, रुई 69.6 फूट, इचलकरंजी 65.7 फूट, तेरवाड 59 फूट, शिरोळ 55 फूट, नृसिंहवाडी 55.6 फूट, राजापूर 43.4 फूट तर नजीकच्या सांगली 29.6 फूट व अंकली 33.7 फूट अशी आहे.

पावसाचा जोर कायम

शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या 24 तासांत राधानगरी (68.7 मि. मी.) तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. याशिवाय तालुक्यातील सरवडे (75), कसबा तरळे (91.8), राधानगरी (91.8) सह शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण (73.5), मलकापूर (69.3), आंबा (98). येथे अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेले असून, दीडशेहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.

14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

गेल्या सहा दिवसांपासून धरण क्षेत्रांत अतिवृष्टी सुरू आहे. पावसाचा जोर वाढतच असून, गेली सलग सहा दिवस 9 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी सुरू आहे. यामध्ये राधानगरी, वारणा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, घटप्रभा, सर्फनाल, कोदे धरणांचा समावेश आहे.

तर, गेल्या 24 तासांत 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये राधानगरी (137 मि. मी.), तुळशी (146), वारणा (110), दूधगंगा (109), कासारी (99), कडवी (100), कुंभी (106), पाटगाव (160), चिकोत्रा (115), चित्री (110), जंगमहट्टी (79), घटप्रभा (166), जांभरे (140), सर्फनाल (200), कोदे (172) अतिवृष्टी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला 25 जुलैपर्यंत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

जिल्ह्यातील 8 राज्यमार्ग व 26 प्रमुख जिल्हा मार्ग बंद

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने, पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. यामुळे 8 राज्यमार्ग व 26 प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. केर्ली गावाजवळ मंगळवारी पाणी आल्याने कोल्हापूर – रत्नागिरी महामार्ग बंद झाला आहे. केर्ली, जोतिबा रोड, पन्हाळा रोड, दानेवाडी, वाघबीळ या मार्गाने पर्यायी वाहतूक सुरू आहे. दरम्यान, शिये – बावडा मार्गाच्या रस्त्यालगत पाणी आले आहे. पाणीपातळीत वाढ झाल्यास हा मार्ग देखील बंद होणार आहे.

राधानगरी धरण 91 टक्के भरले

\"Kolhapur
Kolhapur Rai Update 24 July 2024

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण 91 टक्के भरले आहे. धरण 347.50 फूट पाणी पातळी झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरते. पावसाचा जोर कायम राहिल्यास बुधवारी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. सध्याची पुरस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहाण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

चित्री मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला, 124 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

आज दिनांक 24/07/2024 रोजी सकाळी 6 वाजता चित्री मध्यम प्रकल्प ता. आजरा पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून 124 क्युसेक इतका विसर्ग सुरू झाला आहे.

आतापर्यंत 102 नागरिकांचे स्थलांतर

पंचगंगेची पाणीपातळी सातत्याने वाढत असून, शहराला पुराचा विळखा बसण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे पूरप्रवण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. पुराचे पाणी वाढत असल्याने शहरातील पूरप्रवण भागातील आतापर्यंत 102 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. यामध्ये 40 पुरुष, 29 महिला व 33 लहान मुलांचा समावेश आहे. यातील काही नागरिकांचे चित्रदूर्ग मठ येथे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच आंबेवाडी, चिखली येथील ग्रामस्थांचे आणि जनावरांचेही स्थलांतर करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील 117 खासगी मालमत्तांचे 46 लाखांचे नुकसान

गेल्या 24 तांसात जिल्ह्यातील 33 पक्क्या घरांची, तर 97 कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. याशिवाय 8 जनावरांच्या गोठ्यांचीही पडझड झाली. जिल्ह्यात 117 खासगी मालमत्तेचे 46 लाख 46 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यातील आणखी 22 घरांची अंशतः पडझड झाल्याचे जिल्हा आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले.

Back to top button