News

पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | Kolhapur Rain Update

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालीय. बारा वाजता पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळं प्रशासनानं पंचगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसानं नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालीय. जिल्ह्यात सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून सध्या राजाराम बंधाऱ्यावर 39\’ 02\” इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने (Kolhapur Rain Update) नद्यांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. यामुळे बहुतांशी नद्यांवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या बंधार्‍यांची संख्या 78 आहे. बंधार्‍यांवरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक सध्या बंद झाली आहे. तर काही ठिकाणी नद्यांचे, ओढ्यांचे पाणी रस्त्यावर आल्यानं जवळपास दीडशेहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.

दि.22/07/2024
दुपारी 01:00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
39\’02\”
( 542.12m )
विसर्ग 54503* Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
एकुण पाण्याखाली बंधारे – 78

वारणा धरण – सतर्कतेचा इशारा
दि. 22/07/2024 वेळ:- 10.00 वा
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन आज रोजी पाण्याने सांडवा पातळी घाटली आहे.जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून येत्या चौवीस तासात वक्र द्वाराद्वारे केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.
– वारणा धरण व्यवस्थापन

कोल्हापूर मार्ग बंद यादी – क्लिक करा (Click Here) किंवा खालील फोटो पहा

\"\"

दि.22/07/2024
सकाळी 11:00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
39\’00\”
( 542.07m )
विसर्ग 53467* Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
एकुण पाण्याखाली बंधारे – 81


पंचगंगा इशारा पातळीवर, प्रयाग चिखलीतील नागरिकांचे जनावरांसह स्थलांतर सुरू | Kolhapur Rain Update

\"Kolhapur
Kolhapur Rain Update

कोल्हापूर जिल्ह्यात धुवाँधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांपासून धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी 38.11 फुटांवर पोहोचली आहे. इशारा पातळी गाठण्यासाठी फक्त 1 इंच बाकी असून धोका पातळी गाठायला अजून 4 फूट आहे. पुढच्या तासाभरात पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे.

दरम्यान पंचगंगा इशारा पातळीवर पोहचल्याने पुराचा धोका वाढला आहे. त्यामुळं प्रयाग चिखली परिसरातील नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. पंचगंगा नदीकाठच्या गावांतील लोकांना प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

Back to top button