News

कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग बंद, पंचगंगा इशारा पातळीकडे | Kolhapur Rain Update 21 July 2024

कोल्हापूर | जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे (Kolhapur Rain Update ) अनेक ठिकाणचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. संततधार पडणाऱ्या पावसामूळं कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर पाणी आलयं, त्यामुळं वाहतूक बंद करण्यात आलीय.

मलकापूर शेजारी जाधववाडी इथं 2 फूट पाणी आल्यानं NHAI कडून हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. पर्यायी मार्ग म्हणून अनुस्कुरा घाट मार्गे वाहतूक सुरू होता. मात्र, अनुस्कुरा मार्ग देखील वरनमळी इथं बंद झाला आहे.

गगनबावडा तालुक्यात देखील सुरू असलेल्या संततधार पावसाने कोल्हापूर गगनबावडा वाहतूक मार्ग मांडुकली इथं पाणी आल्यानं बंद होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली असून अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे.

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत देखील सतत वाढ होत असून रात्री 9 वाजताच्या माहितीनुसार, राजाराम बंधारा पातळी 38.02 फूटांवर पोहचली आहे. नदीची इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी 43 फूट आहे. पंचगंगेची इशारा पातळीकडे झपाट्याने वाटचाल सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

दि.21/07/2024
रात्री 9:00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
37\’11\”
( 541.74 m )
विसर्ग 46514 Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
एकुण पाण्याखाली बंधारे – 85

Back to top button