मोटर सायकलच्या धडकेत यवलूज येथील महिलेचा मृत्यू | Kolhapur News
कोल्हापूर | शेतात कामाला जात असताना मोटरसायकलने पाठीमागून धडक दिल्याने यवलूज येथील वत्सला बाळू जाधव (वय ६५) या महिलेचा मृत्यू झाला. साताप्पा मारुती देशमुख (वय २४, मूळ गांव व्हन्नूर, ता. कागल, सध्या रा. यवलूज) या तरुणाच्या स्प्लेंडर मोटरसायकलने त्यांना जोराची धडक दिली. यात त्यांचा मृत्यु झाला आहे.
निटवडे फाटा – वरणगे रस्त्यावर जाताना साताप्पा देशमुख याची स्पलेंडर मोटारसायकलने (एमएच ०९ इ वाय ७१५३) शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वत्सला देशमुख यांना धडक दिली. या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे. मोटारसायकल चालक देशमुख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, मयत वत्सला जाधव या आपल्या शेतावर कामासाठी निघाल्या होत्या. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या साताप्पा देशमुख याच्या मोटरसायकलने जाधव यांना जोराची धडक दिली. यामध्ये वत्सला जाधव गंभीर जखमी झाल्या. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गरीब कुटुंबातील शेतमजूर महिलेचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.