कोल्हापूर | कोल्हापूर – गगनबावडा रोड वरील बालिंगे पुल सुरक्षिततेच्या कारणावरून गेले तीन दिवस बंद करण्यात आला होता, हा पूल आज (27 जुलै) सायंकाळपासून वाहतूकीस खुला करण्याची परवानगी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला.
Kolhapur News – कोल्हापूर – गगनबावडा रोड बंद असल्याने जिल्ह्याच्या करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातील जनतेची गैरसोय सुरू होती. त्यामुळे हा रस्ता तातडीने सुरू करण्याची मागणी केली जात होती.
आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत निर्णय घेऊन हा रस्ता सुरू करण्यास परवानगी दिली आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सायंकाळी 4 पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती आहे.