News

Kolhapur News : घरातून येत होता खोदकामाचा आवाज, सत्य समोर येताच अख्ख्या गाव हादरला, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेने सर्वत्र खळबळ

कोल्हापूर | कोल्हापुरात गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आलाय. राधानगरी तालुक्यातील कौलव येथे हा प्रकार उघडकीस आला असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे याठिकाणी होणारा मोठा अनर्थ टळला आहे. घरात खड्डा खोदून धार्मिक विधी सुरू होता.

याप्रकरणी राधानगरी पोलिसात जादूटोणा कायदा अंतर्गत कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळ याच्यासह  6 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरामध्ये खणण्यात आलेल्या त्या खड्ड्याच्या बाजूला पानविडा, फुल आणि इतर काही गोष्टी स्पष्टपणे दिसून आल्या. राज्यामध्ये जादूटोणा कायदा लागू असतानाच पुरोगामी म्हणवणाऱ्या कोल्हापुरात ही घटना उघडकीस आली आहे.

Kolhapur News

समोर आलेल्या माहितीनुसार शरद माने याच्या घरात हा विधी सुरू होता. घटनास्थळी घरामध्ये चार ते पाच फुटांच्या खड्ड्याशेजारी मोठमोठ्यानं मंत्रोच्चार केले जात होते. गळ्यात रुद्राक्षांची माळा असणारा साधू हे मंत्रोच्चार करताना दिसत होता. शेजारच्यांना हे मंत्रोच्चार ऐकून संशय आल्याने आणि त्यांनी घरात जाऊन पाहिले असता देवघरात त्यांना खड्डा खणल्याचे आढळून आले.

याबाबत सरपंच रामचंद्र कुंभार यांनी अधिक चौकशी केली असता इथे गुप्तधन मिळणार असल्याचे सांगण्यात आले. कुंभार यांनी ही माहिती ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांना दिली. तसेच सर्व यंत्रणांना याची सूचना देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी 6 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Back to top button