कोल्हापूर | कोल्हापूर महापालिकेतील अत्यावश्यक सेवेची व अत्यंत गरजेची पदे भरण्यास राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेने यापूर्वी पाठवलेल्या 182 रिक्त व आवश्यक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. (Kolhapur Mahanagarpalika Bharti 2023)
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2023 – या पदभरतीमध्ये पाणीपुरवठा, अग्निशमन तसेच आरोग्य विभागातील पदांचा समावेश आहे. महापालिकेतील मंजूर पदांमधील अनेक पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होत आहे. शासनाने पद भरतीसाठी मंजुरी दिल्याने महापालिकेतील रिक्त पदांपैकी किमान 550 पदे भरण्यात यावी यासाठी महापालिका कर्मचारी संघाचा प्रयत्न असेल असे संघाचे अध्यक्ष यांनी सांगितले.
Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2023 – महापालिकेकडील रिक्त व तातडीची पदे भरण्याबाबत शासनाच्या नगरविकास विभागाने आदेश काढले होते. त्यासाठी प्रत्येक महापालिकेकडून माहिती मागवली होती. कोल्हापूर महापालिकेने त्यानुसार 182 पदे भरण्यास मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यामध्ये पाणीपुरवठा, अग्निशमन तसेच आरोग्य विभागातील पदांचा समावेश होता.
नगरविकास विभागाने त्याबाबतच्या मंजुरीचा आदेश बुधवारी काढला आहे. त्यामध्ये केवळ या पदभरतीकरिता शासनाच्या मागील निर्णयातील आस्थापना खर्चाच्या 35 टक्क्यांची अट शिथिल केली आहे. विविध संवर्गातील चारही वर्गातील पदे सरळसेवेने भरण्याकरिता सामान्य प्रशासनाने निर्देश दिलेल्या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. ही पदभरती प्रक्रिया शासनाने नमूद केलेल्या संस्थेमार्फत राबवण्यात येणार आहे. या मंजुरीमुळे महापालिकेतील आवश्यक पदे भरता येणार आहेत.