News
Kolhapur Kalamba Lake : मुसळधार पावसामुळे कळंबा तलाव ओव्हरफ्लो, पहा व्हीडीओ
कोल्हापूर | कोल्हापुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहरानजीक असलेला कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे स्थानिकांची पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्यावर्षी 21 जुलै रोजी कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. दरम्यान यावर्षी 24 जुलै रोजी हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.
उपनगरे व लगतच्या ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असणारा ऐतिहासिक शाहू कालीन कळंबा तलाव बुधवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहू लागला. कळंबा तलावाचे पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहू लागल्याचे वृत्त सोशल मीडियावर कळताच कोल्हापूरातील स्थानिक पर्यटकांची तलावाकडे गर्दी होऊ लागली आहे.