पाहिजेत: कोल्हापूरात ‘या’ विविध ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी; नवीन जाहिराती प्रसिध्द, मुलाखती सुरू | Kolhapur Jobs 20 Dec. 2024
कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील विविध आस्थापनांमध्ये आज दिनांक 20 डिसेंबर रोजी 2024 रोजी नोकरीच्या (Kolhapur Jobs) अनेक संधी उपलब्ध आहेत. 10वी पास उमेदवारांपासून ते पदवीधर, आयटीआय, डिप्लोमाधारक अशा सर्व शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी यामाध्यमातून नोकरी मिळवता येणार आहे. यामध्ये फ्रेशर्सपासून अनुभवी उमेदवारांपर्यंत सर्वांनाच नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.
जिल्ह्यातील अनेक कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड बहुतांशी थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
उमेदवारांनी काय करावे?
- कागदपत्रे तयार करा: इच्छुक उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, अर्ज, अद्ययावत रिझ्युमे, पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड तयार ठेवावे.
- दिलेल्या ठिकाणी उपस्थित रहा: संबंधित कंपनीने दिलेल्या ठिकाणी आणि वेळेनुसार मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
कोल्हापूरात कोणत्या ठिकाणी सुरू आहे भरती? Kolhapur Jobs 20 Dec. 2024
1. कोल्हापूरातील नामांकित शोरूम युनिक ह्युंडाईसाठी सेल्स कंन्सलटंट, टीडी को ऑर्डिनेटर, टेक्निशिअन पदांची भरती केली जाणार आहे. कोल्हापूर आणि चंदगड येथील कार्यालयांसाठी ही भरती केली जात आहे. एकूण रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.
2. पुढारी प्रेससाठी प्रिंटर, मशिन हेल्पर, फिटर अशा विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. प्रिंटींग टेक्नॉलॉजितील पदविकाधारक, आयटीआय तसेच इतर विविध पात्रता धारण केलेल्या उमेदवारांसाठी ही योग्य संधी आहे. खालील जाहिरातीत याबाबतचा सविस्तर तपशील देण्यात आला असून पात्र उमेदवारांनी दिलेल्या ईमेल आयडीवर अर्ज पाठवावेत.
3. कोल्हापूरातील टोयोटा शोरूम साठी विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीव्दारे कोल्हापूर, सांगली आणि विटा येथील कार्यालयांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. टीम लिडर, सेल्स ऑफिसर, जनरल सर्विस अॅडव्हायजर, बॉडीशॉप अॅडव्हायजर, जनरल टेक्निशिअन, इलेक्ट्रिकल टेक्निशिअन अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे.
4. पीएसपी पंप्स, फाईव्ह स्टार एमआयडीसी कागल यांना सिनीअर मार्केटिंग मॅनेजर, मार्केटिंग इंजिनीअर पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा किंवा दिलेल्या मेल आयडीवर आपला अर्ज करावा.
5. पार्श्व एंटरप्रायझेस, रूईकर कॉलनी कोल्हापूर यांना सर्वीस टेक्नीशिअन/हेल्पर, सिनीअर सर्वीस इंजीनिअर, सर्विस को-ऑर्डिनेटर अशा विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या व्हाटस अप नंबरवर किंवा मेल आयडीवर आपला अर्ज करावा.
6. सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, राजेंद्रनगर, कोल्हापूर येथे प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, लेक्चरर, लॅब टेक्निशिअन, लॅब अटेंडंट, शिपाई अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक उमेदवारांनी 28 डिसेंबर पूर्वी आपले अर्ज खाली दिलेल्या मेल आयडीवर पाठवावेत असे कळवण्यात आले आहे.
7. डॉ. एस.पी.पाटील मेडिकल कॉलेज अँड केअर हॉस्पीटल कोरोची, इचलकरंजी येथे विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतचा तपशील खालील जाहिरातीत दिलेला आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मंगळवार 26 डिसेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे.
8. स्वस्तिक कंस्ट्रक्शन, शाहुपूरी, कोल्हापूर यांना टॅक्शेशन मॅनेजर, सिनीअर अकाऊंटंट पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या इमेल आयडीवर आपले अर्ज पाठवावेत.
9. आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आष्टा यांना डायरेक्टर पदासाठी उमेदवाराची आवश्यकता आहे.
10. पिंपरी चिंचवड शहरात 250 कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोशिएशन यांना वरिष्ठ व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, अधिकारी व स्टेनो, टायपिस्ट अशा विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या इमेल अॅड्रेसवर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवसाच्या आत अर्ज करावेत.
#Kolhapur Jobs
कोल्हापूरात कोणत्या ठिकाणी सुरू आहे भरती? Kolhapur Jobs 15 Dec. 2024
1. कोल्हापूरातील प्रसिध्द सराफी पेढी महेंद्र ज्वेलर्स यांना कॅशिअर आणि पीआरओ पदासाठी उमेदवारांची आवश्यकता आहे.
2. कोल्हापूर व सांगली येथील नामांकित सराफी पेढी गोविंद नारायण जोग यांना मॅनेजर, सेल्समन, तसेच हाऊस किपींगसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे.
3. न्यू हॉलंड ट्रॅक्टर कंपनीच्या शोरूमसाठी पुलाची शिरोली येथे विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे.
4. वरद डेव्हलपर्स यांना खालील पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे.
5. व्हीजन इंजिनीअरिंग कंपनी, शाहुपूरी कोल्हापूर यांना सिनीअर मॅनेजर, सिनीअर सर्वीस इंजिनिअर तसेच ऑफिस असिस्टंट पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे.
6. कोल्हापूर येथील सीए फर्मसाठी ऑडिट असिस्टंट आणि अकाऊंट क्लार्क पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे.
7. के.पी.पाटील इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुदाळ येथे विविध फॅकल्टीच्या शिक्षक पदांसाठी इच्छूक व पात्र उमेदवारांची आवश्यकता आहे.
8. राज्यातील विविध जिल्ह्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या सोलापूर जनता सहकारी बँकेत ‘ट्रेनी क्लार्क’ पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये कोल्हापूर येथील कार्यालयांसाठी देखील उमेदवारांची आवश्यकता आहे.
9. ऑल मोटो टेक्नॉलॉजी प्रा. लि. 5 स्टार एमआयडीसी कोल्हापूर यांना प्रोडक्शन/क्वालिटी मॅनेजर तसेच अकाऊंटंट पदासाठी उमेदवारांची आवश्यकता आहे.
10. गोकुळ शिरगाव येथील कमला प्लास्टिक कंपनी यांना प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग ऑपरेटर, प्लास्टिक पेट मशीन ऑपरेटर, पॅकिंग करिता महिला कामगार यांची आवश्यकता आहे.
11. खालील मेडिकल फर्मसाठी विविध डॉक्टर्स पदांची आवश्यकता आहे.
12. युनिक ऑटोमोबाईल्स यांना जनरल मॅनेजर, सीआर एम (सेल्स) तसेच सिनीअर मॅनेजर (सेल्स) या पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे.
13. कोल्हापूर, गोकुळ शिरगाव तसेच कागल येथील 250 कोटींहून अधिक टर्नओवर असणाऱ्या कंपनीला खालील पदांसाठी पात्र उमेदवारांची आवश्यकता आहे.
14. इंजिनीअरिंग कामाचा 10 ते 15 वर्षे अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
15. प्रॉपर्टी डेव्हलपर्स, कोल्हापूर यांना विक्री प्रतिनिधी पदासाठी उमेदवारांची आवश्यकता आहे.
16. माई टीव्हीएस यांना जयसिंगपूर येथील शाखेसाठी विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे.
17. साळोखे बिल्डर्स या कन्सट्रक्शन कंपनीला साईट इंजिनिअर व अकाऊंटंट सेल्स (महिला) उमेदवारांची आवश्यकता आहे.
18. संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असणाऱ्या हुतात्मा सहकारी बँकेला खालील पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज कोल्हापूर येथील बँकेच्या खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावेत.