Career

पाहिजेत: आजपासून मुलाखती सुरू; कोल्हापूरात विविध ठिकाणी नोकरीची संधी, विना परिक्षा थेट निवड | Kolhapur Jobs August 2024

कोल्हापूर | कोल्हापूर शहर तसेच जिल्हा परिसरात नोकरीच्या (Kolhapur Jobs) अनेक संधी सध्या उपलब्ध झाल्या आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खालील उपलब्ध नोकऱ्यांपैकी जी योग्य संधी वाटत असेल त्याठिकाणी नोकरीसाठी अर्ज करावयाचा आहे. ज्याठिकाणी थेट मुलाखतीसाठी बोलवण्यात आले असेल अशा ठिकाणी आपल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी हजर राहावे.

1. कोल्हापूरातील नामांकित प्रायव्हेट लि. कंपनीसाठी विविध रिक्त पदांची आवश्यकता आहे. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार अकाऊंट असिस्टंट, मार्केटिंग एक्सिक्युटिव्ह आणि ऑफिस बॉय अशी विविध पदे भरली जाणार आहे.

मार्केटिंग एक्सिक्युटिव्ह पदासाठी फ्रेशर, एमबीए/मार्केटिंग पदवीधर उमेदवार पात्र असून 2 जागा भरल्या जाणार आहेत.
अकाऊंट एक्सिक्युटिव्ह पदासाठी फ्रेशर बीकॉम, टॅली उमेदवार पात्र असून या पदाची 1 जागा भरली जाणार आहे. तर
ऑफिस बॉय पदासाठी 10वी 12वी पास उमेदवार आवश्यक असून या पदाची 1 जागा भरली जाणार आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या बायोडाटा आणि अर्जासह आर.एस.नं 30-5, प्लॉट नं.6, राजेंद्र नगर, जकात नाक्याजवळ, केदारनगर मोरेवाडी येथे संपर्क साधावा. मो. 8030731976

2. कोल्हापूरातील प्रसिध्द हॉस्पिटल अशी ओळख असणाऱ्या स्वस्तिक हॉस्पिटल यांना विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

स्वस्तिक हॉस्पिटल येथे मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस) उमेदवार आवश्यक आहेत. त्याचबरोबर स्टाफ नर्स (बीएस्सी,जीएनएम), वॉर्डबॉय/आया या पदांची भरती केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी स्वस्तिक हॉस्पिटल, हॉटेल सयाजीसमोर दुपारी 12 ते 5 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा.

3. गेल्या पाच दशकांपासून कार्यरत असलेल्या सुस्थापित चौगुले समूह संस्था, लिक्विफाइड इंडस्ट्रियल आणि मेडिसिनल गॅसेसच्या निर्मितीसाठी त्यांच्या कागल M.I.D.C. साठी प्लँटसाठी खालील उमेदवारांची आवश्यकता आहे.

इलेक्ट्रिशियन (ITI): किमान ५-१० वर्षे exp (एले. स्टार्टर, एपीएफसी, ट्रान्सफॉर्मर, सर्किट ब्रेकर, एलबीएस, मोटर, डीजी, यूपीएस, अर्थिंग, मेगरिंगचे ज्ञान असावे.)
मेंटेनन्स फिटर (ITI): किमान ५-१० वर्षे exp (कंप्रेसर, कूलिंग टॉवर, पंप मेंटेनन्स, असेंबल आणि मशीनचे पार्ट्स डिसेम्बलचे ज्ञान असावे.) एक्सप. उत्पादन उद्योगात प्राधान्य दिले जाते.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी कोल्हापूर ऑक्सिजन अँड ॲसिटिलीन प्रा. लि. Ph.08308511400, ई-मेल: jadhav@kolhapuroxygen.in या पत्त्यावर संपर्क साधावा.

4. अथर्व सोल्युशन यांना खालील उमेदवारांची आवश्यकता आहे. याबाबतची सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर – 3 पदे –
4-6 वर्षे अनुभव, आवश्यक कौशल्ये = VB. net, ASP.net, MS SQL, Oracle Education BCS, MCA, BE
ग्राहक सहाय्य अभियंता (पुरुष)- 3 पदे –
अनुभव = 1-3 वर्षे, शिक्षण BCS, MCA, BE (इंजिनीअरिंगला प्राधान्य दिले जाईल) उमेदवार साइटवर जाण्यासाठी तयार असावा.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी hr@atharvasolutions.co.in या इमेल पत्त्यावर त्वरित अर्ज करावेत.

5. कोल्हापूर येथील नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीकरीता खालील जागा भरणेच्या आहेत. याबाबतची सविस्तर जाहिरात आजच प्रसिध्द करण्यात आली आहे. जाहिरातीत नमुद केल्याप्रमाणे खालील विविध पदांची भरती केली जाणार आहे.

1. साईट इंजिनिअर- 4 जागा – 8 ते 10 वर्षांचा अनुभव आवश्यक
2. ज्युनिअर इंजिनिअर – 4 जागा – 4 ते 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
3. साईट सुपरवायझर – 6 जागा – बांधकामाचा 8 ते 10 वर्षांचा अनुभव आवश्यक
4. सिनिअर अकौंटंट- 1 जागा – 8 ते 10 वर्षांचा अनुभव व टॅक्सेशनची माहिती आवश्यक
5. अकौंटट असिस्टंट – 2 जागा – 4 ते 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
6. ड्रायव्हर – 2 जागा – पुणे, मुंबई येथील रोडची माहिती असणारा असावा.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि Resume – snpowar2088@gmail.com येथे पाठवा.
अधिक माहितीसाठी Mobile No. 9552519707

6. कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर या शाळेत माध्यमिक विभागाकडे खालील पद संस्था वेतनावर व शासन निर्णयास अधिन राहून भरावयाची आहेत.

इच्छूक व पात्र उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर अर्जासह मंगळवार, दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे.
पदाचे नाव – लिपिक
शैक्षणिक पात्रता – पदवीधर (संगणक ज्ञान आवश्यक) प्रवर्ग खुला / इ.मा.व.

मुलाखतीचे ठिकाण: कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ, कुडित्रे, ता. करवीर, जि. कोल्हापूर
सेक्रेटरी, कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ, कुडित्रे ता. करवीर, जि. कोल्हापूर. पिन – 416204

7. धरती इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांना खालील उमेदवारांची आवश्यकता आहे. याबाबतची सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

पदाचे नाव –
एचआर-प्रशासक व्यवस्थापक: एमबीए एचआरएमसह पदवीधर, किमान 3 वर्षांचा अनुभव.
विश्लेषणात्मक रसायनशास्त्रज्ञ: M. Sc. विश्लेषणात्मक रसायनशास्त्र, किमान 3 वर्षांचा अनुभव.
ESG/HS अधिकारी: M.Sc. पर्यावरण विज्ञान मध्ये, किमान 3 वर्षांचा अनुभव.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी धरती इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड सेंटर वन, डी-०३, पाचवा मजला, समोर. सासणे मैदान, ताराबाई पार्क, कोल्हापूर 416003 या पत्यावर भेट द्यावी, अथवा pooja.patil@dhartigroup.in.net या ईमेल पत्यावर आपला बायोडाटा आणि अर्ज पाठवावा.

8. कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये एक अग्रगण्य ॲल्युमिनियम ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग फाउंड्री मध्ये खालील उमेदवारांची आवश्यकता आहेयाबाबतची सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

उत्पादन पर्यवेक्षक – 3 पदे
GDC मध्ये 8 ते 10 वर्षांच्या अनुभवासह उमेदवार BE/DME असावा.
फाउंड्री, जीडीसी फाउंड्री प्रक्रियेत पारंगत असले पाहिजे, ज्यामध्ये स्वतंत्र समाविष्ट आहे. नकार समस्या ओळखणे आणि सोडवणे.

GDC ऑपरेटर – 6 पदे
उमेदवाराला जीडीसी फाउंड्रीमध्ये 3 ते 5 वर्षांचा अनुभव असावा, टिल्टिंग जीडीसी मशीन ऑपरेटिंग ज्ञानात पारंगत.

चाचणी प्रयोगशाळा ऑपरेटर -2 पदे
उमेदवाराला ३ ते ५ वर्षांचा अनुभव असावा, ॲल्युमिनियम फाउंड्री, सर्व लॅब इन्स्ट्रुमेंट्स ऑपरेटिंग ज्ञानात पारंगत असले पाहिजे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी संपूर्ण बायोडेटासह अर्ज करावा. सध्याचा पगार आणि अपेक्षित पगार यासह whatsapp क्रमांक: 9370245787 ईमेल: hroffice.1843@gmail.com

9. रामकृष्ण फाउंड्री प्रा. लि. कागल, 5 स्टार M.I.D.C. कोल्हापूर यांना खालील विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. याबाबतची सविस्तर प्रसिध्द झालेली जाहिरात खालील लिंकवर देखील पहायला मिळेल.

स्वयंचलित HPML फाउंड्री साठी उमेदवार आवश्यक आहेत
फाउंड्री प्रोडक्शन इन्चार्ज बीई/डीएमई अनुभव -10-15 वर्षे – 1 पोस्ट
एमआर बीई/डीएमई, अनुभव – 7-8 वर्षे -1 पोस्ट
मेंटेनन्स इन्चार्ज बीई/डीईई, अनुभव – 8-10 वर्षे – 1 पोस्ट
फेटलिंग इन्चार्ज बीई/डीएमई, अनुभव – 8-10 वर्षे – 1 पोस्ट
मशीन शॉप हेड बीई/डीएमई अनुभव – 12-15 वर्षे – 1 पोस्ट
फाउंड्री प्रक्रिया पर्यवेक्षक बीएससी/डीएमई, अनुभव – 2-3 वर्षे – 2 पदे
मेंटेनन्स-फिटर/वेल्डर ITI, अनुभव – 2-5 वर्षे – 3 पोस्ट

योग्य उमेदवारांसाठी पगाराची मर्यादा नाही. इच्छुक उमेदवार त्यांचे बायोडेटा खालील ईमेल/व्हॉट्सॲपवर पाठवू शकतात. mis@ramkrishnafoundry.com WhatsApp क्रमांक: 8956225503 कार्यालय: प्लॉट क्रमांक B-139, कागल, 5 स्टार M.I.D.C. कोल्हापूर. 416 216

10. श्री. प. बा. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुदाळ, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथे शिक्षक पाहिजेत. याबाबतची सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

माध्यमिक (C.B.S.E.) व ज्युनियर कॉलेज
विषय PHYSICS – शैक्षणिक पात्रता – B.E / B.Sc./M.Sc / B.Ed (पगार Minimum 25 हजार+)
विषय ENGLISH – शैक्षणिक पात्रता – B.A / M.A. / B.Ed / M.Ed (पगार Minimum 12 हजार+)

निवड प्रक्रिया गुरुवार, दिनांक : 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता लेखी परीक्षा व डेमोद्वारे करण्यात येईल.
टीप: उमेदवाराचा अनुभव व Performance विचारात घेऊन पगारवाढ केली जाईल.
संपर्क: 9405692567, 9404954093

11. आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ, कळंबे तर्फ कळे संचलित आनंदी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग (महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, MUHS नाशिक संलग्न) यांना विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे.

टीप: उमेदवारांनी बायोडेटासह मुलाखतीला हजर राहावे.
मुलाखतीचे ठिकाण: संस्था कार्यालय, कळंबे तर्फ कळे (कोल्हापूर-गगनबावडा रोड)
तारीख: 24 ऑगस्ट 2024 वेळ: सकाळी 10 वाजेपासून संपर्क क्रमांक 9421175722,7972919009

12. प्रीमियर प्रिंटर, वसंत प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खालील पत्यावर अर्ज करावेत.

पदाचे नाव –
रिसेप्शनिस्ट कम ऑफिस असिस्टंट -(पुरुष/महिला – 1 पोस्ट)
उमेदवार इंग्रजी आणि मराठी भाषेत अस्खलित असावा, कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. फाईलिंग, पत्रव्यवहार, नोंदी, मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल सॉफ्टवेअर आणि इंटरनेट चालवण्याचे अनुभव आणि पूर्ण ज्ञान.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर 7 दिवसांच्या आत अर्ज करावे.
प्रीमियर प्रिंटर 1079, Kh-2, वसंत प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर, फोन नंबर: 0231-2530325, ई-मेल: office@premierprintpack.com

13. जनता शिक्षण संस्था कोतोली संचलित, नेहरू विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कोतोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याबाबतची सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

या शाळेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडे खालील पदे संस्था वेतनावर व शासन निर्णयास अधिन राहून भरावयाची आहेत. तरी गरजू व पात्र उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर अर्जासह सोमवार, दि. 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे.

(माध्यमिक विभाग)
ग्रंथपाल – B.Lib. & I.Sc.
क. लिपिक – पदवीधर (संगणक ज्ञान आवश्यक)

(उच्च माध्यमिक विभाग)
सहा. शिक्षक – M.Sc. B.Ed. (जीवशास्त्र)

टीप : राखीव प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झालेस खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचा विचार केला जाईल.
मुलाखतीचे ठिकाण : नेहरू विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कोतोली, ता. पन्हाळा,
सेक्रेटरी, जनता शिक्षण संस्था कोतोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

14. बिंद्रा स्टील प्रा. लि. यांना परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, नाशिक, अमरावती, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यासाठी विविध पदांची भरती करायची आहे.

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह
पात्रता: डिप्लोमा इन सिव्हिल, बीई सिव्हिल, एमबीए (मार्केटिंग) किंवा टीएमटी बारच्या सेल्स आणि मार्केटिंगमधील अनुभवासह कोणतीही पदवी, योग्य उमेदवाराला TMT बारच्या विक्री आणि विपणनाचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.
अनुभवी उमेदवाराला प्राधान्य. आकर्षक पगार पॅकेज.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपला CV यावर शेअर करा: hr.marketingroopam@gmail.com किंवा क्रमांक:- 7391092425 येथे पाठवा.

15. कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, साधना हायस्कूल पुनाळ, ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात देखील प्रसिध्द करण्यात आली आहे.

इच्छूक व पात्र उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर अर्जासह मंगळवार, दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पदाचे – लिपिक
शैक्षणिक पात्रता – पदवीधर (संगणक ज्ञान आवश्यक) प्रवर्ग खुला / इ.मा.व.

मुलाखतीचे ठिकाण: कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ, कुडित्रे, ता. करवीर, जि. कोल्हापूर
सेक्रेटरी, कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ, कुडित्रे ता. करवीर, जि. कोल्हापूर. पिन – 416204

16. श्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ, कागल संस्थेमार्फत सुरू असलेल्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर, कागल येथे विनाअनुदानित तुकडीवर खालील पात्रतेच्या उमेदवारांची भरती करावयाची आहे.

पदाचे नाव – सहा. शिक्षक H.SC. (Science) D.Ed. TET Pass
इच्छुकांनी अर्ज व मूळ शैक्षणिक व्यावसायिक कागदपत्रांसह स्वखर्चाने दि. 2 स्पटेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता शिक्षण संकुल, कागल-मुरगूड रोड, कागल येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

17. MARVELOUS ENGINEERS PVT.LTD. E-12, F-13/8 कागल, MIDC कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

इच्छूक व पात्र उमेदवारांनी recruitment@marvelousengineers.com या पत्यावर अर्ज करावेत. अथवा
MARVELOUS ENGINEERS PVT.LTD. E-12, F-13/8 कागल, MIDC कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

18. शहीद शिक्षण प्रसारक मंडळ, तिटवे, जि. कोल्हापूर यांना शहीद सीताराम कॉलेज ऑफ ऑर्किटेक्चर यांना खालील पदांची भरती करावयाची आहे. याबाबतची सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्राचार्य, व्याख्याता, रिसर्च फेलो
पीएच.डी. किंवा एम. आर्क. 5 वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवासह बी.आर्क. / M.Sc. (रसायन/भौतिकशास्त्र)
एम.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी/बायोकेमिस्ट्री/कॉम्प्युटर सायन्स) आणि PG-DMLT 1. M.Sc. वनस्पतिशास्त्र मध्ये. वर्गीकरणातील स्पेशलायझेशन अनुभव तसेच इतर विषयांतील संशोधन विद्वान देखील अर्ज करू शकतात.

रेक्टर/क्रीडा – 1 ते 2 वर्षांचा अनुभव, कोणताही पदवीधर
प्रशिक्षक, अधिकारी – संबंधित क्षेत्रातील अनुभव, प्रशासक कार्यालय प्रशासनातील किमान 5 वर्षांचा अनुभव असलेला कोणताही पदवीधर.

तुमचा बायोडाटा sscoap@gmail.com, mentor.jpf@gmail.com वर पाठवा किंवा आमच्याशी 9595360125, 7218180066 वर संपर्क साधा.

19. MARUTI SUZUKI ARENA, KR MOTORS कोल्हापूर जिल्ह्यातील मारुती सुझुकीचे एकमेव रॉयल प्लॅटिनम डिलर ‘केआर मोटर्स’ च्या विस्तारीकरणासाठी पाहिजेत!

टीम लीडर (M/F) – 5 जागा.
कोल्हापूर शहर, हातकणंगले, गडहिंग्लज, चंदगड
ग्रॅज्युएट डिप्लोमा, ऑटोमोबाईल, फायनान्स, इन्शुरन्स, मधील अनुभव

सेल्स एक्झिक्युटिव्ह (M/F) – 35 जागा
कोल्हापूर शहर, मलकापूर, गारगोटी, हातकणंगले, गडहिंग्लज
वय: 28 वर्ष पर्यंत, ग्रॅज्युएट/डिप्लोमा, 2/4 व्हिलर/ट्रॅक्टर सेल्स मधील अनुभव

युज्ड कार इव्हॅल्युएटर – 7 जागा
कोल्हापूर शहर, गारगोटी, गडहिंग्लज (ऑटोमोबाईल क्षेत्रातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक)

बॉडीशॉप / सर्व्हिस अॅडव्हायझर (M) – 5 जागा
मलकापूर, हातकणंगले, गडहिंग्लज, गोकुळ शिरगांव (फोर व्हीलर वर्कशॉप मधील 2 ते 4 वर्षांचा अनुभव)

युज्ड कार सेल्स एक्झिक्युटिव्ह – 3 जागा
गोकुळ शिरगाव (सेल्स मधील 2ते 3 वर्षांचा अनुभव)

असिस्टंट वर्कशॉप मॅनेजर – 1 जागा
गोकुळ शिरगाव (फोर व्हीलर वर्कशॉप मधील 4 ते 5 वर्षांचा अनुभव)

आकर्षक पगार आणि इंन्सेंटिव्ह-महिन्याच्या एक तारखेला.
इच्छुक उमेदवारांनी बायोडाटा Email/Whatsapp करावा किंवा मुलाखतीसाठी प्रत्यक्ष भेटावे.
केआर मोटर्स, मारुती सुझुकी अरेना, मार्केट यार्ड समोर, कोल्हापूर. ई-मेल: hr@krmotors.co.in | संपर्क : 7447420055 7447755516

20. श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी थेट वॉक-इन-इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे.

अशोकराव माने आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, वाठार तर्फ वडगाव येथे खाली नमूद केलेल्या पदांसाठी मुलाखती घेण्यात येतील. रविवार 8 स्पटेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता मुलाखतींचे करण्यात आले आहे.

Back to top button