पाहिजेत: कोल्हापूरात रिसेप्शनिस्ट, नर्सिंग स्टाफ, सेल्सपर्सन, मार्केटिंग, मॅनेजर, अकाऊंटंट, टेक्निशिअन, ऑफिसर्स अशा विविध पदांच्या नोकरीच्या संधी | Kolhapur Jobs
कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या (Kolhapur Jobs) नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. पदनिहाय शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा या बाबी वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार सदर ठिकाणी अर्ज करावेत किंवा मुलाखतीसाठी हजर राहावे.
1. विंग्ज 44 डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. कंपनीला विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. कंपनी मध्ये डिझाईन इंजिनीअर, अकाऊंटंट, असिस्टंट (मार्केटिंग), हेल्पर अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी विंग्ज 44 डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि., शिरोली एमआयडीसी, लोकमत प्रेसजवळ, कोल्हापूर या पत्त्यावर भेट द्यावी. किंवा आपले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह wings44design@gmail.com किंवा 91756 76244 या क्रमांकावर व्हाटस अप करावेत.
2. नीता इंस्ट्रूमेंटस यांना मोल्डींग सुपरवायझर, फेल्टींग सुपरवायझर तसेच पॅकिंग सुपरवायझर या पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. सदर पदांसाठी उमेदवारांकडे या क्षेत्रातील 3 ते 5 वर्षांचा अनुभव देखील आवश्यक आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज neeta.instruments@gmail.com या मेलवर किंवा 9503134999 या क्रमांकावर पाठवावेत.
3. सुयश ग्रुप ऑफ कंपनीज, शिरोली एमआयडीसी, कोल्हापूर याठिकाणी विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याठिकाणी प्लँट हेड (फाँड्री, मशीन शॉप), सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजर, ईआरपी सिस्टीम को-ऑर्डिनेटर अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी suyashgrouphr1997@gmail.com या इमेल आयडीवर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी 7744977731 या क्रमांकावर संपर्क साधावा.
4. श्री. दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ याठिकाणी बीएस्सी अॅग्री किंवा एमएस्सी अॅग्री पात्रता धारण केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. याठिकाणी केन डेव्हलपमेंट ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसात klp.dattasssk@gmail.com या मेल आयडीवर आपले अर्ज पाठवावेत.
5. दत्ताजीराव माने सराफ, न्यू गुजरी कोल्हापूर, यांना सेल्समन व सेल्सवुमन पदांसाठी पात्र उमेदवारांची आवश्यकता आहे. उमेदवारांना सोने-चांदीच्या दुकानात काम करण्याचा अनुभव असणे गरेजेचे आहे. इच्छूक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 9552927633 किंवा 9850108821 या क्रमांकावर संपर्क साधावा.
6. सेराफ्लक्स इंडिया प्रा. लि., गोकुळ शिरगाव एमआयडीसी, कोल्हापूर यांना टेक्निकल सर्विस, मार्केटिंग अशा विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. बीई, डीएमई, बीएस्सी, एमबीए अशी पात्रता सदर पदांसाठी आवश्यक आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी कंपनीच्या hrd@ceraflux.com या मेल आयडीवर 5 जानेवारी पर्यंत आपले अर्ज पाठवावेत.
Satara Jobs
8. कवित्सु उद्योग समुह, सातारा यांना विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची आवश्यकता आहे. याठिकाणी प्रोडक्शन इन्चार्ज, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल इंजिनीअर, एक्जिक्युटिव्ह इंटरनॅशनल ऑपरेशन, सर्विसिंग इंजिनीअर, शिफ्ट सुपरवायझर, सीएनसी/व्हीएमसी प्रोगामर/सेटर तसेच ऑपरेटर पदांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी recruitment@kavitsu.com या मेलआयडीवर अर्ज पाठवावेत.