पाहिजेत: कोल्हापूर जिल्ह्यात नोकरी शोधताय? या विविध ठिकाणी मिळेल नोकरी, लगेच करा अर्ज, मुलाखत द्या.. नोकरी पक्की! Kolhapur Jobs 2025
कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील नोकरीच्या (Kolhapur Jobs 2025) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी प्रत्येक आठवड्यात नवनवीन नोकरीच्या ज्या संधी उपलब्ध असतील त्या तुमच्या पर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न करतो. आज सोमवार 6 जानेवारी 2024 रोजी जिल्ह्यातील विविध खाजगी आस्थापनांमध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधी खालीलप्रमाणे आहेत. उपलब्ध नोकऱ्यांसाठी तुम्ही योग्य उमेदवार असाल तर ही संधी चुकवू नका. आणि जर तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील नोकरीची गरज असेल तर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्या गरजूला नोकरी मिळण्यास नक्की मदत होईल.
Kolhapur Jobs 2025
1. साधू वासवानी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गांधीनगर, कोल्हापूर येथे शिक्षक पदांसाठी भरती सुरू आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी शुक्रवार 10 जानेवारी रोजी जाहिरातीत दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
2. सेप्रो-टेक इंजिनिअरिंग प्रा. लि. गोकुळ शिरगाव, याठिकाणी वेल्डर तसेच फिटर पदासाठी 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. डीप्लोमा/आयटीआय तसेच संबंधित कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांनी hr.seprotech@gmail.com या मेल आयडीवर अर्ज करावेत.
3. नीता इंस्ट्रूमेंटस्, एमआयडीसी, शिरोली यांना सीएनसी ऑपरेटर, व्हीएमसी ऑपरेटर, व्हीएलटी ऑपरेटर अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक उमेदवारांनी neeta.instruments@gmail.com या ईमेलवर अर्ज करावेत.
4. पुढारी पब्लिकेशन यांना युनिट अटेंडंट/हेल्पर पदासाठी आयटीआय/12वी झालेले अनुभवी किंवा फ्रेशर उमेदवार आवश्यक आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी jobshr@pudhari.co.in या ईमेल पत्यावर अर्ज करावेत.
5. प्रो सपोर्टस् या फर्मसाठी चार्टर्ड अकाऊंटंट, बॅक ऑफिस एक्सिक्युटिव्ह, सेल्स को-ऑर्डिनेटर (महिला), मॅनेजर अशा विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 3 ते 7 जानेवारी दरम्यान जाहिरातीत दिलेल्या पत्यावर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे.
6. शांती एंटरप्रायझेस, एमआयडीसी शिरोली याठिकाणी इंजिनिअर्स आणि सीएनसी ऑपरेटर पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. एकूण 10 रिक्त जागांसाठी याठिकाणी नोकरी उपलब्ध आहे. बीई मेकॅनिकल/डीएमई/आयटीआय उमेदवारांनी hr@shanteeenterprises@gmail.com या इमेल पत्यावर अर्ज करावेत.
7. कोल्हापूर येथील एका उच्चभ्रू कुटूंबासाठी कुक, हेल्पर तसेच वायरमन आणि प्लंबरची आवश्यकता आहे. इच्छूकांनी 880 646 4644 या क्रमांकावर संपर्क साधावा.
8. पुढारी पब्लिकेशन यांना फोर्क लिफ्ट ऑपरेटर पदासाठी उमेदवाराची आवश्यकता आहे. यासाठी 4 ते 5 वर्षांचा अनुभव असणारे उमेदवार पात्र असून उमेदवार कोल्हापूर शहर परिसरातील असणे आवश्यक आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी jobshr@pudhari.co.in या ईमेल पत्यावर अर्ज करावेत.
9. शांतीनिकेत सीबीएसई स्कुल यांना विविध विषयांसाठी शिक्षकांची आवश्यकता आहे. यासाठी विविध विषयांसाठी B.Ed, B.P.Ed, M.P.Ed, MTTC/NTT उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 31 जानेवारी 2025 पूर्वी hr@shantiniketankop.edu.in या ईमेल पत्यावर अर्ज करावेत.
10. सुनील पाटील असोशिएट्स यांना आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन पदासाठी पात्र उमेदवाराची आवश्यकता आहे.
11. जे.डी.थोटे डेअरीज, सांगली रोड, आष्टा यांना कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर तसेच संपूर्ण कोकण आणि गोवा याठिकाणी मार्केटिंग ऑफिसर्सची आवश्यकता आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी hr.thotedairy@gmail.com या ईमेल पत्त्यावर अर्ज करावेत.
12. मारूती सुझुकी इंडियाच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वर्कशॉप मॅनेजर, सेल्स मॅनेजर, स्पेअर पार्ट मॅनेजर, सर्विस अॅडव्हायझर, अकाऊंट मॅनेजर अशा विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे.
13. सायरस पुनावाला स्कूल, पेठवडगाव यांना प्रायमरी, सेकंडरी तसेच नॉन टिचिंग पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखती व्दारे केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी रविवार 12 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे. तत्पूर्वी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 10 जानेवारी 2025 पूर्वी आपले अर्ज hrm@dcpis.edu.in किंवा manager@dcpis.edu.in या ईमेल पत्त्यावर अर्ज करावेत.