पाहिजेत: कोल्हापूर जिल्हा व परिसरात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध; पात्र उमेदवारांची थेट निवड, संधी चुकवू नका | Kolhapur Jobs 2025

Kolhapur Jobs 2025: कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी मिळालेली संधी वाया न घालवता याठिकाणी नोकरीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी बायोडाटा आणि कागदपत्रांसह प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे. तर काही ठिकाणी दिलेल्या इमेल पत्त्यावर किंवा व्हाटस् अप क्रमांकावर आपला बायोडाटा आणि अर्ज पाठवायचा आहे. चला तर जाणून घेऊया कोल्हापूर जिल्हा आणि जिल्हा परिसरात कोणकोणत्या ठिकाणी सध्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

1. कोल्हापूरातील स्काय ग्लोबल, शिरोली यांना अॅडमिनिस्ट्रेटर आणि मार्केटिंग एक्सिक्युटिव्ह पदासाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. यासाठी बीई, एमबीए, डिप्लोमा, किंवा बीएस्सी केमेस्ट्री, डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग अशी पात्रता आवश्यक आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी hr@skyglobal.co.in या ईमेलवर किंवा 9146181188/9503995440 या क्रमांकावर अर्ज करावा किंवा संपर्क साधावा.

2. साऊंड कास्टिंग प्रा. लि. पंचतारांकित एमआयडीसी कागल, यांना चारचाकी चालवण्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता आहे. शिक्षण 10वी किंवा 12वी पास तसेच चारचाकी चालवण्याचा 3 वर्षांचा अनुभव व ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी साऊंड कास्टिंग प्रा. लि. युनीट 2, सी-10, पंचतारांकित एमआयडीसी कागल येथे संपर्क साधावा.

3. बुक्स अॅंड मोअर, नागाळा पार्क, कोल्हापूर यांना सेल्स एक्झिक्युटिव्ह उमेदवारांची आवश्यकता आहे. शिक्षण 10वी किंवा 12वी पास, तसेच या क्षेत्रातील किमान 5 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपर्क साधावा किंवा व्हाटस् अप 9850300621/booksnmorekop@gmail.com यावर अर्ज करावा.

4. चौगुले ग्लोबल ग्रुप यांना त्यांच्या कोल्हापूर ऑक्सीजन अॅंड अ‍ॅसिटिलीन प्रा.लि. फर्मसाठी इंस्ट्रूमेंटेशन टेक्निशिअन पदासाठी उमेदवाराची आवश्यकता आहे. उमेदवार आयटीआय किंवा डिप्लोमा इन इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग झालेला असावा. तसेच 3 ते 5 वर्षांचा अनुभव देखील आवश्यक आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी एचआर मॅनेजर, कोल्हापूर ऑक्सीजन अॅंड अ‍ॅसिटिलीन प्रा.लि. किंवा jadhav@kolhapuroxygen.in या इमेल आयडीवर किंवा 8308511400 या क्रमांकावर संपर्क साधावा.

5. महेश इंजिनिअरिंग सर्विसेस, लक्ष्मीपुरी, कोंडाओळ, कोल्हापूर यांना अकौटंट कम रिक्ववरी इन्चार्ज, ऑफिस बॉईझ कम डिलिव्हरी बॉईज, उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी लक्ष्मीपुरी येथील पत्त्यावर सविस्तर अर्जासह दुपारी 4 ते 7 पर्यंत समक्ष भेटावे.

6. कोल्हापूरातील नामांकित डायग्नोस्टिक आणि रिसर्च लॅबसाठी लॅब टेक्निशिअनची आवश्यकता आहे. उमेदवारांनी डीएमएलटी, एमएलटी किंवा बीएस्सी (बायो, मायक्रोबायोलॉजी, झूलॉजी, केमिस्ट्री) पात्रता धारण केलेली असणे गरजेचे आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी 7888006302 या क्रमांकावर सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत संपर्क साधावा.

7. कोल्हापूरातील नामांकित सराफी पेढी, महेंद्र ज्वेलर्स यांना त्यांच्या इचलकरंजी येथील शोरूमसाठी सेल्सपर्सन, बॅक ऑफिस, टेलिफोन ऑपरेटर, ऑफिसबॉय अशा विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी महेंद्र ज्वेलर्स, दाते मळा, इचलकरंजी यांच्याशी 0230-2422551 किंवा 7588326651 या क्रमांकावर संपर्क साधावा.

8. लक्ष्मी सल्फेटस् या इचलकरंजी येथील केमिकल प्लँटसाठी प्लँट मॅनेजर या पदासाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. बीई, डिप्लोमा (केमिकल, मेकॅनिकल) किंवा बीएस्सी पात्रता धारक उमेदवार यासाठी पात्र आहेत. तसेच उमेदवारांकडे 5 ते 10 वर्षांचा केमिकल इंडस्ट्री किंवा शुगर फॅक्टरीतील कामाचा अनुभव आवश्यक आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी office.laxmisulphates@gmail.com या ईमेलवर किंवा 8087336579/9325678111 या व्हाटस् अप क्रमांकावर संपर्क साधावा.

9. नामांकित शिक्षण संस्थेमध्ये होस्टेल रेक्टर, स्पोर्टस् इनचार्ज, शिपाई व कामगार, शेतीकामासाठी जोडपे, वॉचमन तसेच बाऊंन्सर नेमणे आहेत. इच्छूक व पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 9763135623/7875709395 या क्रमांकावर संपर्क साधावा.

10. कोल्हापूर येथील नामांकित हॉस्पीटलसाठी मेडिकल ऑफिसर, अनुभवी जर्नालिझम, टीपीए, फार्मासिस्ट, रिसेप्शनिस्ट, नर्सिंग स्टाफ व नर्सिंग इन्चार्ज अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी 7768999006/9763414098 या क्रमांकावर संपर्क साधावा.

11. अमेरिकन कन्सलटिंग फर्म, युरिका टेक, कोल्हापूर यांना एमबीए एचआर, एमसीए, बीई, बीटेक पात्रता धारक उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी 26 व 27 जानेवारी रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. अधिक माहितीसाठी 8766686569 या क्रमांकावर संपर्क साधावा.

12. के.डी.इंजिनिअर्स अँड सिस्टीम यांना एचआर सुपरवायझर, कोअरशॉप सुपरवायझर, एचएमसीव्हीएमसी ऑपरेटर, मेंटेनन्स इंजिनिअर, कोअर शॉप कोल्ड बॉक्स/मशिन ऑपरेटर/मिक्सर ऑपरेटर, मशिन शॉप सुपरवायझर, हेल्पर्स अशा विविध पदांसाठी उमेदवारांची गरज आहे. खाली दिल्याप्रमाणे वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणाऱ्या उमेदवारांनी के.डी.इंजिनिअर्स अँड सिस्टीम, सी.स.नं.1135, तन्वी प्लाझा, एफ-1 पहिला मजला, उचगाव, कोल्हापूर या पत्त्यावर दुपारी 12 ते 4 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा.

13. व्हीजन ऑफ फायनान्स कन्सलटन्सी सर्विसेस यांना मार्केटिंग सेल्स एक्झिक्युटिव्ह, ऑफिस बॉय, टेलिकॉलर सिस्टीम ऑपरेटर, टीम लीडर अशा विविध पदांसाठी स्त्री व पुरूष उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी बायोडाटासह व्हीजन ऑफ फायनान्स कन्सलटन्सी सर्विसेस, शॉप नं1, ग्राऊंड फ्लोअर, आयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे सकाळी 10ः30 ते दुपारी 1ः00 यावेळेत समक्ष भेटावे.

14. भारत टूल्स, फाईव्ह स्टार एमआयडीसी, कोल्हापूर यांना प्लँट हेड, एमआर अँड कंपनी लेवल डाटा, सीएनसी सेटर कम सुपरवायझर, अकाऊंटंट, जॉब इन्सपेक्टर, व्हीएमसी/सीएनसी ऑपरेटर, सीएनसी ट्रेनी ऑपरेटर अशा विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी प्लॉट नं ए, 102, पंचतारांकित एमआयडीसी, कागल येथे संपर्क साधावा. किंवा bharattoolscompany31@gmail.com तसेच 8669040830 यावर बायोडाटा पाठवून संपर्क करावा.

15. सेंट झेविअर्स हायस्कूल, कोल्हापूर यांना असिस्टंट टिचर पदासाठी पात्र उमेदवारांची आवश्यकता आहे. उमेदवार बीएस्सी.बीएड (मॅथ्स, सायन्स) +TET, तसेच एचएससी डी.एड+TET पात्रता धारक असणे गरजेचे आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी xavierskop.hr@gmail.com या ईमेल पत्त्यावर 30 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करावेत.

16. सांगली येथील नामांकित शिक्षण संस्थेला बीए/एम बीएड (मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र), बीएस्सी/एमएस्सी बीएड (गणित, विज्ञान) या विषयांसाठी शिक्षकांची आवश्यकता आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी 9763135623 किंवा 8446298215 या क्रमांकावर संपर्क साधावा.