Career

कोल्हापूरात ‘या’ विविध ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी; नवीन जाहिराती प्रसिध्द, संधी चुकवू नका | Kolhapur Jobs 2025

Kolhapur Jobs 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था तसेच कंपन्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी सध्या उपलब्ध झाल्या आहेत. आज दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात नोकरीच्या संधी (Jobs in Kolhapur) कोणकोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत, हे आपण जाणून घेऊया..

Kolhapur Jobs 2025

1. पुरूषोत्तम नारायण गाडगीळ यांना कोल्हापूर शाखेसाठी सेल्समन आणि सेल्सगर्ल हव्या आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता 12 किंवा पदवीधर असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 15 जानेवारी 2025 पर्यंत पाठवावेत. अर्ज पाठवण्याचा पत्ता – पुरूषोत्तम नारायण गाडगीळ, मातोश्री प्लाझा, व्हीनस कॉर्नर कोल्हापूर – 416003

2. गलॅडिअन्स प्रा. लि. मुडशिंगी या नामांकित टेक्नॉलॉजी कंपनीला असेंब्ली ऑपरेटर व क्वालिटा टेस्टर पदांसाठी उमेदवार हवे आहेत. 10वी, 12वी, आयटीआय, डिप्लोमा, डिग्री उमेदवारांनी अर्जासह 11 ते 15 जानेवारी 2025 या दरम्यान सकाळी 10 वाजता भेटावे. अधिक माहितीसाठी 09422554305 या क्रमांकावर संपर्क साधावा.

3. कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लि. यांना कनिष्ठ लिपीक पदाच्या रिक्त जागा भरवयाच्या आहेत. एकूण 10 रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी लेखी परिक्षेसाठी www.kopbankasso.co.in या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 आहे.

4. अविष्कार इन्फ्रा यांना सेल्स एक्झिक्युटिव्ह (महिला), टेलिकॉलर/रिसेप्शनिस्ट (महिला), ग्राफिक डिझायनर, ऑफिस बॉय, कुक अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. इच्छूकांनी 966 5555 474 या क्रमांकावर संपर्क साधावा.

5. नामांकित कंपनीला गोवा येथील कामासाठी इंजिनीअर बीई किंवा डीईई झालेले उमेदवार आवश्यक आहे. उमेदवार अनुभवी असल्यास किंवा ओव्हरहेड केबल्स, एचटी, एलटी डी.पी व फोर पोल स्ट्रक्चर अशा कामांचा अनुभव असल्यास प्राधान्य. तसेच इलेक्ट्रिशिअन, वायरमन, वेल्डर, हेल्पर अशा विविध पदांसाठी देखील उमेदवारांची गरज आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी 922 5631 011 किंवा 880 680 7509 या क्रमांकावर संपर्क साधावा.

6. पारिख उद्योग यांना मॅनेजर एचआर, अॅडमीन, असिस्टंट मॅनेजर प्रोडक्शन, असिस्टंट मॅनेजर मार्केटिंग, असि. मॅनेजर क्वालिटी कंट्रोल, डेव्हलपमेंट इंजिनीअर, लॅब इन्चार्ज अशा विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी info@parikhudyag.com या ईमेल आयडीवर अर्ज करावेत.

7. साई सर्विस, कोल्हापूर यांना जुन्या कार्सच्या विक्रीसाठी सेल्स एक्झिक्युटिव्हची आवश्यकता आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी बुधवारी 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 2 यावेळेत पार्वती टॉकिज जवळ, उद्यमनगर, कोल्हापूर येथे मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवारांची निवड झाल्यास तात्काळ अपाँईंटमेंट लेटर दिले जाईल.

8. अॅल्युमिनिअम फौंड्री कामासाठी शिरोली एमआयडीसी, कोल्हापूर येथे व्हीएमसी प्रोगॅमर, क्वालिटी इन्सपेक्टर तसेच ड्रायव्हर पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूकांनी 9822 9999 79 या क्रमांकावर संपर्क साधावा.

9. अॅग्रीकल्चर व इंडस्ट्रीयल पंप क्षेत्रातील आघाडीच्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या ठिकाणी अकाऊंटंटची आवश्यकता आहे. उमेदवार बीकॉम, एमकॉम असावा. तसेच उमेदवारास जीएसटी, टीडीएस, बँकिंग, ऑडीट तसेच इनक्म टॅक्स संदर्भातील कामाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवाारांनी बीके सेल्स, सिटी सर्व्हे नं. 1432 डी, सी वॉर्ड, लक्ष्मीपुरी कोंडाओळ या पत्त्यावर आठ दिवसांच्या आत अर्ज करावेत.

10. मेनन अॅंड मेनन लिमिटेड यांना हेड पर्चेस तसेच सीनीअर ऑफिसर (आयटी) पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. उमेदवारांना कामाचा अनुभव असणे फार गरजेचे आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मेनन अॅंड मेनन लि. विक्रमनगर, कोल्हापूर येथे किंवा hrd@menon.in या ईमेल वर अर्ज करावेत.

Back to top button