कोल्हापूर | कोल्हापूर येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्याची तारीख 27 जुन 2023 आहे.
‘रिलेशनशिप मॅनेजर / कस्टमर मॅनेजर / बॉडी शॉप कौन्सेलर, मेंटेनन्स / फिटर / हेल्पर, लॅब ऑपरेटर, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रिशियन / वेल्डर, क्यूसी इंजिनीअर, प्रोडक्शन इंजिनीअर, मॅनेजर, मॅनेजर टर्नर, फिटर, C.N.C ऑपरेटर’ इ. पदांकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे.
या पदभरती अंतर्गत 87 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी https://shorturl.at/mnyDS या लिंकचा वापर करावा. तसेच पदभरतीच्या अधिक माहितीसाठी https://bit.ly/3eLQpJ2 ही लिंक तपासावी. हा मेळावा शासकीय निवासस्थान, सी बिल्डिंग, विचारे माळ, कोल्हापूर याठिकाणी पार पडणार आहे.