News
कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी खुला | Balinga Bridge
कोल्हापूर | पूरस्थितीमुळे बंद असलेला कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगा पूल (Balinga Bridge) वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. नदीची पाणीपातळी धोका पातळीच्या खाली गेल्याने हा पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र.२, कोल्हापुर या विभागाच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी (कोल्हापूर-बालींगे-कळे-साळवन-ते गगनबावडा) या रस्त्याच्या किमी ७९/५०० बालींगे – भोगावती नदीवरील अस्तित्वातील जुन्या दगडी कमानी पुला खालून वाहणाऱ्या पूराच्या पाण्याची पातळी धोका पातळीच्या खाली आली असल्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी सुरु करण्यात आल्याची माहिती उप अभियंता आर.बी.शिंदे यांनी सोमवारी (२९ जुलै ) दिली आहे.