News

कोल्हापूर शहरात \’या\’ विविध ठिकाणी पूराचे पाणी | Kolhapur Flood 2024

पंचगंगा 45 फूट 6 इंचावर, पाणीपातळीत सातत्याने वाढ सुरूच

कोल्हापूर | जिल्ह्यातील धरणक्षेत्रासह सर्वत्र पावसाची तुफान वृष्टी सूरू आहे. यामुळे धरणांमधून नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्ग वाढल्याने पूरपातळीत मोठी वाढ सूरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने कोल्हापूर शहर देखील महापुराच्या विळख्यात सापडलं आहे. शहरात आज सकाळपासून विविध ठिकाणी महापूराचं पाणी शिरलं असून नागरिकांची चिंता वाढली आहे. पंचगंगेची पाणीपातळी देखील 45.6 फूटांवर पोहचली आहे. शहरातील खालील ठिकाणी सध्या पुराचं पाणी शिरलं आहे.

कोल्हापूर शहरातील पाणी आलेले ठिकाणी खालील प्रमाणे आहेत.
1. लक्षतीर्थ वसाहत आयडियल कॉलनी,
2. गायकवाड वाडा पंचगंगा तालीम रोड,
3. सुतार वाडा, सीता कॉलनी सीपीआर चौक,
4. खानविलकर पेट्रोल पंपाची बॅक साईड विश्वकर्मा अपार्टमेंटच्या पिछाडीस, विंग्स हॉस्पिटल समोर,
5. पोलो ग्राउंड रमणमळा पॅलेस ऑर्चिड अपार्टमेंट परिसर पाण्यामध्ये, माळी मळा, 6.जावडेकर पिछाडीस,
7. रेणुका मंदिर च्या पिछाडी ग्रहयोग आपारमेंटच्या बॅक साईडला,
8. उलपे मळा, शिये नाका रस्ता बंद
9. मलयगिरी मुक्त सैनिक वसाहत, सफायर पार्क कदमवाडी, बापट कॅम्प स्मशानभूमी, जाधव वाडी ते कदमवाडी रस्ता
10. वीट भट्टी कामगार वस्ती, तावडे हॉटेल परिसर.

आ. सतेज पाटील यांची पूरग्रस्त भागाला भेट, नागरिकांशी साधला संवाद

कोल्हापुरातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील यांनी आज सकाळी आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव यांच्या समवेत लक्षतीर्थ वसाहत, शाहूपुरी, बापट कॅम्प भागास भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधला.

गणेशोत्सव जवळ आल्यामुळे बापट कॅम्प येथे मूर्ती बनविण्याची लगबग सुरु असताना, आलेल्या पुरामुळे कुंभार बांधवांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना महापालिका पदाधिकाऱ्यांना पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच चित्रदुर्ग मठ येथे विस्थापित झालेल्या नागरिकांशीही त्यांनी चर्चा केली.

यावेळी काँग्रेसचे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते. पुराच्या परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास यावेळी सतेज पाटील यांनी नागरिकांना दिला.

\"\"

दि.26/07/2024
दुपारी 4:00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
45\’-06\”
( 544.05m )
*विसर्ग64734 * Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
*एकुण पाण्याखाली बंधारे – 92

Back to top button