News

पंचगंगा धोकापातळीवर, कोल्हापुर महापुराच्या विळख्यात! ड्रोनद्वारे पाहा कोल्हापूरच्या पूराची धडकी भरवणारी दृश्य | Kolhapur Flood 2024

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळीच्या अगदी जवळ पोहोचली आहे. रात्री 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राजराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 42\’09 फूटांवर पोहचली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठचा सगळा परिसर जलमय झाला आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिवाजी पूल, शिये-बावडा रोड, तसेच कोल्हापूरचे प्रवेशव्दार असलेल्या तावडे हॉटेल परिसरात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. खालील ड्रोन व्हीडीओच्या माध्यमातून आपण कोल्हापूरातील पूरपरिस्थिती पाहू शकता.

ड्रोनद्वारे पाहा कोल्हापूरच्या पूराची दृश्य | Kolhapur Flood 2024

ड्रोनद्वारे पाहा कोल्हापूराच्या पूराची दृश्य | Kolhapur Flood 2024

राधानगरी धरण सध्या 93 टक्के भरलं असून कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. 

दि.24/07/2024
रात्री. 11:00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
42\’ 09\”
( 543.22m)
विसर्ग 62482 Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
*एकुण पाण्याखाली बंधारे – 81

दि.24/07/2024
सायं. 7:00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
*42\’-07\”
*( 543.17m)
*विसर्ग 62313 Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
*एकुण पाण्याखाली बंधारे – 81

पंचगंगा नदीचं पाणी कसबा बावडा ते शिये रस्त्यावर आलं असून कसबा बावडा ते शिये मार्गावर चार ते पाच फूट पाणी साचलं आहे. पाण्यातून जाताना अनेक दुचाकी पाण्यातच बंद पडल्या आहेत. तर पंचगंगा नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे कसबा बावडा ते शिये हा महत्त्वाचा मार्ग प्रभावित झाला असून वाहतूक बंद झाली आहे.

पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिवाजी पूल तसेच कोल्हापूरचे प्रवेशव्दार असलेल्या तावडे हॉटेल परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. त्यामुळे कोल्हापुरकरांची चिंता वाढली असून 2019 आणि 2021 च्या महापुराची आठवण कोल्हापूरकरांना झाली आहे.

Back to top button