Video पहा: राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले.. धरणातून 8640 क्युसेक विसर्ग सुरू, पंचगंगेची पाणीपातळी 43.04 फूटांवर | Kolhapur Flood 2024
🔴 इशारा 🔴
आज दि. 25/7/2024 सायंकाळी 4.30 वा.राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 7 उघडले आहे. धरणाची एकूण पाच ( क्र.3,4,5,6,व 7 ) द्वारे उघडली आहेत.
विसर्ग – द्वार क्र.3,4,5,6 व 7 मधून 7140 cusec व BOT पॉवर हाऊस मधून 1500 cusec असा एकूण 8640 cusec इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. तरी नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी.
दरम्यान सायंकाळी 5:00 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 43\’-04\” (543.39 m) फूटांवर पोहचली असून
विसर्ग 63003 Cusecs सूरू आहे. (नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
जिल्ह्यातील एकुण पाण्याखाली बंधारे – 85
कोल्हापूर | राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले असून आज सकाळी 10.05 वाजता धरणाचा 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. त्यानंतर लगेचच आणखी एक दरवाजा उघडला आहे.
पावसाचा जोर राहिला तर धरणाचे अन्य स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून 2928 क्युसेक्स इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे. नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पंचगंगेनं ओलांडली धोका पातळी; पाणी 43 फूटाहून अधिक.. कोल्हापूरला महापूराचा विळखा | Kolhapur Flood 2024
कोल्हापूर | गेल्या चोवीस तासात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट असून सध्या 43\’1\’\’ इतकी पाणीपातळी झाली आहे. त्यामुळं नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
सोबतच राधानगरी धरणाच्या आणि इतर धरणक्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम असल्याने पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राधानगरी पूर्ण क्षमतेने भरत आल्याने कोणत्याही क्षणी 3 स्वयंचलित दरवाजे उघडून भोगावती नदीत 5800 क्युसेक पाणी विसर्ग होण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे.
दि.25/07/2024
सकाळी. 9:00* वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
43’1”
( 543.32m)
विसर्ग 62803 Cusecs
62737( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
एकुण पाण्याखाली बंधारे – 83
राधानगरी धरण 98.20 टक्के भरले
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण ९८.२० टक्के भरले आहे. धरण ३४७.५० फूट पाणी पातळी झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरते. सध्या धरणाची पाणी पातळी ३४६.७२ फूट झाली असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अर्धा फूट पाणी कमी आहे. पावसाचा जोर कायम असून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचालित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे.
राधानगरी धरणाचे तीन दरवाजे कोणत्याही क्षणी उघडून 5800 क्युसेक पाणी विसर्ग होण्याची शक्यता; महापूराचा धोका वाढल्याने सतर्कतेचा इशारा | Kolhapur Flood 2024
कोल्हापूर | राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर (Kolhapur Flood 2024) वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. तर इकडे पंचगंगेची पाणी पातळी 42\’11\’\’ फूटावर पोहचली असून नागरिकांची धास्ती वाढली आहे.
Kolhapur Flood 2024: राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडल्यास भोगावती नदी पात्रात धरणातील विसर्ग 1500 cusecs मध्ये वाढ होऊन एकूण 5800 cusec इतका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
तुळशी धरण दिनांक 25/07/2024 रोजी 84% भरले असून तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जलाशय परिचलन सूची प्रमाणे पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी धरण सांडव्यावरून कधीही विसर्ग सोडला जाऊ शकतो. यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
अलमट्टी धरणातून २.४५ लाख क्युसेकने विसर्ग सुरू
अलमट्टी धरणातून आज सकाळी सहा वाजता २ लाख ४५ हजार क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे. सध्या पंचगंगेने धोका पातळी ओलांडली आहे. धरण क्षेत्रात काल रात्री पासून पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरीचा विसर्ग सुरु झाल्यास २०२१ ची परिस्थिती उद्भऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज
संभाव्य पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या या संत गतीने धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याने नदीकाठच्या लोकांची चिंता वाढली असून, त्यांचे स्थलांतर सुरू झालं आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्त भागातील कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस जोरदार सुरु असल्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबोहर पडा, तसेच पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
कोयना धरणात ७५.२६ टीएमसी पाणीसाठा
आज दि. २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वा. धरणामध्ये एकूण ७५.२६ टीएमसी ७१.५१ % पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज संध्याकाळी ४:०० वा. धरणाची वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उचलून सांडव्यावरून १०००० क्युसेक्स विसर्ग सुरू करणेत येणार असून येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल.
धरण पायथा विद्युत गृहामधील १०५० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ११०५० क्युसेक्स असेल. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.
दि.25/07/2024
सकाळी. 7:00* वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
42\’-11\”
( 543.27m)
विसर्ग 62652 Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
*एकुण पाण्याखाली बंधारे – 81
पाणीपातळी
तारीख- 25/07/2024
वेळ – पहाटे 7:00 वाजता
(धोका पातळी/आत्ताची पातळी)
पंचगंगा नदी
राजाराम – ५४३.२ ९m / 543.27m
सुर्वे – ५४३.६२m / 540.75m
रुई – ५३९.५m / 539.79m
इचलकरंजी – ५३९.९८m /536.74m
तेरवाड – ५४०.५५m / 536.67m
शिरोळ – ५४२.०७m / 535.67m
नृसिंहवाडी – ५३९.००m/535.52m
भोगावती नदी
बालिंगा – ५४६.३o m / 545.65m
कासारी नदी
नीटवडे – ५४४.००m / ०544.68m
वारणा नदी
शिगाव – ५४६.००m /545.58m
दुधगंगा नदी
कागल हायवे – ५४१.९१m /538.83m
वेदगंगा नदी
बानगे पूल – ७.५०m / 6.85m
हिरण्यकेशी नदी
भडगाव पूल – ७.५०m/ 6.30m
घटप्रभा नदी
हिंडगाव बंधारा – ७.०० m / 6.80 m
ताम्रपर्णी नदी
कोवाड बंधारा – ६.८०m / 6:00m