कोल्हापूर | आजरा तालुक्यातील गवसे जवळ आजारा पोलिसांनी 10 कोटी 74 लाख रूपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. या उलटीचे वजन 10 किलो पेक्षा अधिक असून आत्तापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. दैनिक पुढारीने याबाबत वृत्त दिले आहे.
व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी पोलिसांनी कुडाळ येथील पाच जणांना ताब्यात घेतले आहे. कुडाळ येथून ही तस्करी करण्यात येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सकाळपासून सापळा रचला होता.
आजरा पोलिसांनी आंबोली आजरा मार्गावर पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.