News

कोल्हापूर: पंचगंगा नदीत आढळला अनोळखी मृतदेह | Kolhapur Crime News

कोल्हापूर | पंचगंगा नदीपात्रात आज शनिवार 6 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अंदाजे 50 वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेची (Kolhapur Crime News) माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

मृतदेहाच्या अंगावर टी-शर्ट आणि हाप पॅन्ट असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर येथे पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

पोलीस आता मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास करत आहेत. तसेच, नदीपात्रात मृतदेह कसा आला याबाबतही चौकशी सुरू आहे.

Back to top button