News
कोल्हापूरात युवकाचा भर दिवसा खून.. परिसरात खळबळ | Kolhapur Crime News
कोल्हापूर | कनान नगर येथील युवकाचा काठी आणि दगडाने ठेचून खून करण्यात आला. पंकज भोसले असे मृताचे नाव आहे. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास राजारामपुरी येथील दीपा गॅस एजन्सी नजीक हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, राजारामपुरी पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. कनान नगर परिसरात राहणाऱ्या तरुणांनीच हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
सविस्तर माहिती लवकर अपडेट करण्याचा प्रयत्न केला जाईल. Kolhapur Crime News