News

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा भिंतीवर डोके आपटून खून; पतीला अटक | Kolhapur Crime News

कोल्हापूर | राधानगरी तालुक्यातील चाफोडी येथे पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना (Kolhapur Crime News) सोमवारी सायंकाळी घडली. पांडुरंग ज्ञानू चरापले (४८) याने पत्नी मंगलबरोबर वारंवार होणाऱ्या वादातून रागाच्या भरात हे अमानुष कृत्य केले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वादाची स्थिती निर्माण झाली होती. सोमवारी सायंकाळी हा वाद चांगलाच वाढला आणि पांडुरंगने रागाच्या भरात मंगलचे डोके भिंतीवर जोरात आपटले. त्यानंतर त्याने दोरीने गळा आवळून तिचा जीव घेतला.

घटना घडल्यानंतर पांडुरंगने मंगलला बेशुद्ध अवस्थेत राशिवडे येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. त्याने मंगल जिन्यावरून पडल्याचे सांगून उपचारासाठी विनंती केली. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून मंगलच्या नातेवाईकांनी राधानगरी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

पो. नि. संतोष गोरे आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पांडुरंगला ताब्यात घेतले. त्याने चौकशीदरम्यान गुन्हा कबूल केला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची अधिकृत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Back to top button