News

अयोध्येहून परतताना भरधाव कारचा भीषण अपघात: कोल्हापुरातील 4 जण ठार; 1 जखमी

कोल्हापूर | अयोध्येवरून परतताना कोल्हापूरातील चार जणांचा कार आणि कंटेनरच्या अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पाचोर येथे सोमवारी (दि.8) सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला.

पाचोर पोलीस स्टेशनच्या प्रभारी आकांक्षा शर्मा यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या अपघातात अत्तार रमिला, अमीन अत्तार आणि भगवान दगडू पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर दिलदार तांबोळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात अनिल पाटील हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सर्व जण कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी

कारमधील सर्व लोक कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते कारने उत्तर प्रदेशातील अयोध्येहून महाराष्ट्रात परतत होते. दरम्यान, राजगड जिल्ह्यातील पाचोर जवळील सारेडी गावाजवळ कारचा अपघात झाला. भरधाव असलेली कार थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

सर्व जण एकाच कंपनीत काम करत होते.

यात कारमधील पाचपैकी चौघांचा मृत्यू झाला. एक गंभीर जखमी झाला आहे. त्यांना प्राथमिक उपचारानंतर शाजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी इंदूरला हलविण्यात आले. कारमधील सर्व जण एकाच कंपनीत काम करत होते. ते सर्व जण अयोध्या सहलीवर गेले होते.

दरवाजा तोडून जखमींना बाहेर काढले

रविवारी संध्याकाळी अयोध्येहून परतत असल्याची माहिती भगवान पवार यांनी घरच्यांना दिली होती. तेच गाडी चालवत होते. अपघात एवढा भीषण होता की, दरवाजा अडकल्याने पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून जखमींना बाहेर काढले.

Back to top button