News

इचलकरंजीतील नगर भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी याला 75 हजाराच्या लाच प्रकरणात अटक | Kolhapur Bribe News

कोल्हापूर | प्लॉटचे सामिलीकरण करण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच (Kolhapur Bribe News) मागितल्याप्रकरणी इचलकरंजीतील नगर भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदाराने त्यांच्या प्लॉटचे सामिलीकरण करण्यासाठी २२ जुलै २०१४ रोजी इचलकरंजी नगर भूमापन अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. संबंधित अर्जावरील काम कोल्हापूर जिल्हा अधीक्षक भूमिलेख कार्यालयात प्रलंबित असल्याचे सांगून कर्मचाऱ्याने ३० हजार रुपयांची लाच मागितली. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

तपासादरम्यान, दुष्यंत कोळी यांनी संबंधित प्रकरणातील अर्ज मंजूर करण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत कोळी यांना अटक केली.

कोल्हापूर विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंखे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल संदीप काशिद, पोलिस नाईक सचिन पाटील, सुधीर पाटील, पूनम पाटील, प्रशांत दावणे यांनी कारवाईत भाग घेतला.

Back to top button