फक्त चवीसाठी नाही तर उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त: ‘पेरू’ | Benefits Of Guava

मुंबई | पेरू फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी खावं असं म्हणतात ते काही उगाच नाही. (Benefits Of Guava) कारण पेरू विविध आजारांवर उपयुक्त ठरतात. त्यामुळेच पेरूला अमृतपण म्हटलं जातं. जाणून घेऊया कोण कोणत्या आजारांवर पेरू उपयुक्त ठरतात.

पोट फुगणे (ब्लोटींग)
महिलांमध्ये ब्लोटींगची समस्या बऱ्याचदा जास्त दिसते. विशेषतः पिरीयडसच्या आसपासच्या काळात हा त्रास अधिक जाणवतो. यासाठी काळं मीठ लावून दिवसा पेरू खावा. पोटातली सूज कमी करून ब्लोटींगची समस्या कमी होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी
पेरू खाल्ल्याने बऱ्याच कॅलरीज कमी होतात. त्यामुळे तुम्हाला हेल्दी राखण्यास आणि वजन कमी करण्यासाठी पेरू फार उपयुक्त ठरतो. शिवाय पेरूत फायबर अधिक असल्याने मेटाबोलिक रेट वाढून बेली फॅट कमी होण्यास मदत मिळते.

हार्ट प्रॉब्लेम
पेरूमध्ये सोडीयम आणि पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं. यामुळे रक्तवाहिन्या हेल्दी पाहण्यास आणि बीपीची समस्येला बॅलेंस करण्यासाठी मदत होते. यासोबत हे फळ चांगल्या कोलेस्ट्रॉलाचा स्तर वाढतो आणि हृदय हेल्दी राहतं.

दृष्टी सुधारणयासाठी
पेरूमध्ये व्हिटॅमिन ए असतो. त्यामुळे दृष्टी सुधारण्यासाठी त्याची मदत होते. पेरू खाल्ल्याने फक्त दृष्टी सुधारते एवढच नाही तर यामुळे मोतीबिंदूसारखी समस्याही दूर होण्यास मदत मिळते.

बध्दकोष्ठता
इतर फळांच्या तुलनेत पेरूमध्ये फायबर सर्वात जास्त असते. एका पेरूत १२ टक्के फायबर असल्याने पचन आणि आरोग्याविषयीच्या अनेक समस्यांवर उपाय होतो. यामुळे पोटाचा मोटाबोलिक रेट सुधारतो आणि बॉवेल मुव्हमेंट फास्ट होतो. बध्दकोष्ठतेसाठी रिकाम्या पोटी मीठ लावून पेरू खाऊ शकतात.

सर्दी खोकल्यावर परिणामकाराक
सर्दी खोकल्यावर पिकलेला पेरू उपयुक्त ठरतो. हे फार असरदार आहे. पेरुमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं त्यामुळे सर्दी, खोकल्यावर ते परिणामकारक सिद्द होतं. यामुळे श्वसन मार्गातलं म्युकस दूर होतो. आणि श्वसन मार्ग, घसा, फुफ्फूस साफ करून सर्दी खोकल्याची समस्या दूर करतात.