व्हिटॅमिन आणि ऊर्जेचा स्रोत: जाणून घ्या मटारचे फायदे | Benefits Of Green Peas

मुंबई | थंडीचा मोसम सुरू झाला कि बाजारात हिरव्या वाटाण्याची अर्थात मटारची (Benefits Of Green Peas) आवक वाढू लागते. मटार खाण्यासाठी चवदार असतात. केवळ चविष्ठच नाही, तर त्यात बरीच पोषक द्रव्ये देखील असतात. मटारमध्ये व्हिटॅमिन ए, बी 1, बी 6, सी आणि के आढळतात. म्हणूनच मटारला व्हिटॅमिन आणि ऊर्जेचा उत्तम स्त्रोत अर्थात ‘पॉवरहाऊस’ देखील म्हटले जाते. जे शाकाहारी लोक त्यांच्या आहारात प्रोटीन समाविष्ट करू इच्छितात त्यांच्यासाठी मटार एक चांगला पर्याय आहे. चला जाणून घेऊया हिवाळ्यात मटार खाल्ल्याने आपल्या शरीराला कसा फायदा होतो.

मधुमेहामध्ये फायदेशीर –
जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर मटारचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी मधुमेहाचा धोका कमी करतात.

हृदयासाठी फायदेशीर –
हिवाळ्यात वाटाणा खाणे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी खनिजे असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. यासोबतच कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहाते.

हाडांसाठी आवश्यक –
मजबूत हाडांसाठी व्हिटामिन के आवश्यक आहे. व्हिटामिन के ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येपासून शरीराचे रक्षण करते. उकडलेल्या हिरव्या वाटाण्यामध्ये व्हिटामिन के-1 प्रमाण 46 टक्के इतके असते. ज्यामुळे हाडे मजबूत राखण्यास मदत होते.

दृष्टी सुधारते –
हिरवे वाटाणेदेखील आपली दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात. मटारमध्ये कॅरोटीनॉइड रंगद्रव्य ल्युटीन असते, जे डोळ्यांशी संबंधित रोग जसे की मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका टाळते. जर तुमची दृष्टी कमजोर असेल तर तुम्ही भरपूर मटार खावे.

त्वचेसाठी गुणकारी –
मटारमध्ये आढळणारा व्हिटामिन सी कोलेजनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते. हिरव्या वाटाण्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅटेचिन, एपिक्टिन, कॅरोटीनोईड्स आणि अल्फा-कॅरोटीन असतात, जे अकाली वृद्धत्वाची लक्षणे (अँटाएजिंग) थोपवू शकतात.

वजन कमी करते –
मटारमध्ये असलेले फायबर आणि प्रथिने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तुम्हाला कमी भूक लागते. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर हिवाळ्यात मटार नक्की खा. तुम्ही हिरव्या मटारचे सूप देखील घेऊ शकता.