News

खुपीरे येथे दुध टँकरच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार!

कोल्हापूर | खुपीरे येथील बल्क सेंटर मधील दूध आणण्यासाठी आलेल्या गोकुळ दुध संघाच्या टँकरने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत मोटारसायकल वरील युवक जागीच ठार झाला. कृष्णात खेमराज बेगडा वय ३० मूळ गाव रत्नागिरी सध्या रा. महादेव प्रसाद हॉटेल , दोनवडे ता करवीर असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

अपघातस्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, मृत युवक महादेव प्रसाद हॉटेल दोनवडे येथे कुक म्हणून कामास आहे. तो खुपीरे ग्रामीण रुग्णालयात कामाला असणाऱ्या आपल्या मावस भावाकडे गेला होता. सकाळी ८ च्या सुमारास तो दोनवडे येथील हॉटेल कडे परत निघाला असता कोल्हापूरकडून येणाऱ्या दूध टँकरने (एम एच ०९ जीजे ४१४९) त्याला सामोरा समोर जोराची धडक दिली. या धडकेत तो जागीच ठार झाला. अपघातानंतर टँकर चालक पळून गेला असून अधिक तपास करवीर पोलीस करीत आहेत.

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर सध्या अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. यामुळे वाहतूक करणाऱ्यांची अडचण होताना दिसून येते. दोनवडे फाटा येथे देखील रस्त्याचे कामे सुरू आहेत. याठिकाणी योग्यरित्या वाहतूक निर्देशक फलक देखील नसल्याने सातत्याने याठिकाणी अपघात होत असल्याचे दिसून येते.

Back to top button