चंद्रपूर | केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी, चंद्रपूर येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
याठिकाणी, PGT, समुपदेशक, विशेष शिक्षक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 सप्टेंबर 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी, चांदा

सदर पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवार संबंधित तारखेला सकाळी 08.00 वाजता मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहावे. मुलाखतीदरम्यान कोणताही प्रवास भत्ता देय असणार नाही. मुलाखतीसाठी नोंदणी संबंधित तारखेला सकाळी 08.00 ते सकाळी 09.00 पर्यंतच केली जाईल. सदर पदांकरिता मुलाखत 16 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.
PDF जाहिरात – Kendriya Vidyalaya Chandrapur Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – chandaof.kvs.ac.in