Saturday, September 23, 2023
HomeCareerकेंद्र प्रमुख भरती परीक्षा स्थगित; 2 हजारपेक्षा अधिक पदांची होणार होती भरती...

केंद्र प्रमुख भरती परीक्षा स्थगित; 2 हजारपेक्षा अधिक पदांची होणार होती भरती | Kendra Pramukh Bharti 2023

मुंबई | राज्यभरात गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या केंद्रप्रमुख भरतीला शासनाने हिरवा कंदील दाखविला होता. या निर्णयामुळे राज्यात अनेक वर्षांनी 34 जिल्ह्यांतील केंद्रप्रमुखांची 2 हजारपेक्षा अधिक रिक्त पदे भरली जाणार होती. त्यासाठी अर्जही भरले गेले, मात्र, न्यायालयात आव्हान मिळताच नियोजित परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यामुळे हजारो इच्छूक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा घेतली जाणार होती. त्याची अधिसूचना काढून परीक्षापूर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद व नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाल्या आहेत.

काय आहे नेमके कारण?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार 5 जून 2023 रोजी विभागीय मर्यादित परीक्षेची अधिसूचना जारी केली होती. परिषदेने सर्वच प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून दिलेली होती.

यामुळे प्रशिक्षित पदवीधर पदावर असणाऱ्या बी.एड.धारक शिक्षकांवर अन्याय होत आहे. याबाबत 19 जून रोजी झालेल्या खंडपीठाच्या सुनावणीनंतर परीक्षा पुढे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


मुंबई (22 जून 2023) | केंद्र प्रमुख भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले असून परीक्षेचा (Kendra Pramukh Bharti 2023) पुढील कालावधी यथावकाश परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

अधिसूचना जा.क्र.मरापप/बापवि / 2023/3504, दिनांक 05/06/2023 अन्वये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – 2023 या परीक्षेचे आयोजन माहे जून 2023 च्या शेवटच्या आठवडयामध्ये करण्यात आले होते. परंतू मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे शासन पत्र संकिर्ण 2022/प्र.क्र.81/ टीएनटी-01, दि. 20 जून 2023 अन्वये मान्यता मिळाल्यानुसार प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येते आहे. परीक्षेचा पुढील कालावधी यथावकाश परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. (Kendra Pramukh Bharti 2023)

50 वर्षांच्या वयोमर्यादेची अट रद्द करून सर्व इच्छुक पदवीप्राप्त प्राथमिक शिक्षक व पदवीधर प्राथमिक शिक्षक यांना समान संधी द्यावी. ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 15 जून ही अतिशिघ्र वाटत असल्याने अर्ज भरण्याची मुदत वाढवावी, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. 


महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाअंतर्गत मेगाभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीद्वारे शिक्षक या पदाच्या रिक्त जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ६ जून २०२३ रोजी सुरुवात झाली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे. कामाचा अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या मेगाभरतीद्वारे निवड झाल्यास उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. शिक्षकांच्या एकूण २३८१ जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून ही आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीची कमाल वयोमर्यादा ५० वर्ष आहे. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना ठराविक रक्कम प्रवेश शुल्क म्हणून भरावी लागेल. सर्व संवर्गातील उमेदवार ९५० रुपये, तर दिव्यांग उमेदवारांना ८५० रुपये अर्जासह भरावे लागणार आहेत. भरतीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यातून पुढे निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर केला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular