Tuesday, September 26, 2023
HomeCareer10वी ते पदवीधरांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरी; त्वरित अर्ज करा | KDMC...

10वी ते पदवीधरांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरी; त्वरित अर्ज करा | KDMC Recruitment 2023

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023

मुंबई | कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (KDMC Recruitment 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. येथे एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

KDMC Recruitment 2023 – याठिकाणी ‘पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (पुरुष), ANM, फार्मासिस्ट, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, टीबी हेल्थ व्हिजिटर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ थुंकीचे सूक्ष्मदर्शक’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट या पदांसाठी अर्ज करण्याची तारीख 08 ऑगस्ट 2023 आहे. तसेच, इतर पदांसाठी 02 ऑगस्ट ते 04 ऑगस्ट पर्यंत आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण (प.) पिन – 421301
मुलाखतीचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हाल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे

PDF जाहिरात – KDMC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटkdmc.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular